दिनांक 21 January 2020 वेळ 5:39 AM
Breaking News
You are here: Home » Tag Archives: Dahanu

Tag Archives: Dahanu

स्वामी विवेकानंदांच्या जयंतीदिनी 151 सुर्यनमस्कार

डहाणूच्या महिलांची लिम्का बुकमध्ये नोंद राजतंत्र न्युज नेटवर्क/डहाणू दि. 13 : दिनांक 12 जानेवारी रोजी, स्वामी विवेकानंदांच्या जयंतीदिना निमित्ताने राष्ट्रीय युवा दिवस साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून येथील पतंजली योग समितीच्या योग वर्गातील 11 महिलांनी या दिवशी 151 सूर्यनमस्कार करण्याचा विक्रम केला आहे. चेतना योग या मुंबईतील प्रतिष्ठित संस्थेने मुंबईतील अंधेरी येथे सदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या ... Read More »

पत्रकारिता जगण्यासाठी नव्हे, तर जगवण्यासाठी! -संजीव जोशी

शिरीष कोकीळ/डहाणू, दि. 6 : पत्रकारिता जगण्यासाठी नसून जगवण्यासाठी आहे आणि ती कुठल्याही दडपणाशिवाय करता आली पाहिजे, असे प्रतिपादन मराठी पत्रकार परिषदेचे अखिल भारतीय सरचिटणीस, तथा दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव जोशी यांनी डहाणू येथे बोलताना काढले. ते दर्पण दिनानिमित्त डहाणू व तलासरी तालुका पत्रकार परिषदेतर्फे आयोजित पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष ... Read More »

डहाणू : केवायसीच्या नावाखाली महिलेच्या बँक खात्यातून 34 हजार लंपास

राजतंत्र न्युज नेटवर्क/डहाणू, दि. 23 : पेटीएमच्या केवायसी प्रक्रियेच्या नावाखाली अज्ञात भामट्याने हायटेक चोरी करत डहाणू येथील 62 वर्षीय फिरोजा ताफ्ती यांच्या बँक खात्यातून 33 हजार 700 रुपयांची रक्कम लंपास केली आहे. ताफ्ती यांच्या तक्रारीनंतर याप्रकरणी डहाणू पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास करण्यात येत आहे. पर्यावरण प्रेमी म्हणून ओळखल्या जाणार्‍या फिरोजा ताफ्ती यांना 19 डिसेंबर रोजी ... Read More »

मसोली नाक्यावर पोलीस चौकीची मागणी

प्रतिनिधी/डहाणू, दि. 22 : डहाणू रेल्वे स्टेशन ते डहाणू गाव या रहदारीच्या मुख्य रस्त्यावरील मसोली नाका या चौकात वाढलेल्या रहदारीवर नियंत्रण ठेवून अपघात टाळण्यासाठी येथे पोलीस चौकी उभारण्याची मागणी, काँग्रेसचे पालघर जिल्हा सरचिटणीस मोईज शेख यांनी लेखी निवेदनाद्वारे पालघर पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. या भागात असलेली औद्योगिक वसाहत, इंग्रजी माध्यमाच्या दोन व गुजराती माध्यमाची एक शाळा, महाविद्यालय, शुभ कार्यासाठीचे दोन ... Read More »

डहाणू दुहेरी हत्याकांडातील आरोपीला तिहेरी जन्मठेप

अन्य एका आरोपीची पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता पालघर सत्र न्यायालयाचा निकाल शिरीष कोकीळ/डहाणू, दि. 20 : तालुक्यातील बावडा येथील आपल्या चिकूच्या वाडीतील बंगल्यात राहणार्‍या इराणी दांपत्याच्या घरी दरोडा घालून धारदार शस्त्राने दोघांची हत्या करणारा आरोपी मोहमद रफीक आदम शेख उर्फ रवी रामखिलावनसिंग ठाकूर याला काल, गुरुवारी पालघर सत्र न्यायालयाने तिहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर या प्रकरणातील दुसरा आरोपी भगवानलाल मोहनलाल ... Read More »

डहाणू पेंशनर्स डे उत्साहात साजरा

प्रतिनिधी/डहाणू, दि. 18 : सेवानिवृत्त कर्मचारी संघाच्या डहाणू विभागातर्फे 17 डिसेंबर पेंशनर डे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त मसोली येथील साईबाबा मंदिराच्या सभागृहात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डहाणू तालुका सेवानिवृत्त संघाचे अध्यक्ष मारुती वाघमारे, डहाणू विभागाच्या अध्यक्षा सौ. शैलजा पाटील, पालघर जिल्हा संघटनेचे सरचिटणीस बापूराव देवकर, कासा विभागाचे अध्यक्ष हेमंत धर्ममेहेर, डहाणू तालुका ... Read More »

डहाणू तालुका पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्याने हादरला

वार्ताहर/बोईसर, दि. 15 : डहाणू तालुका पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्याने हादरला असून आज, रविवारी पहाटे काही भागांमध्ये 3.8 रिस्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्याने नागरीकांची झोप उडवली. डहाणू तालुका हा भूकंपग्रस्त तालुका समजला जातो. गेले वर्षभर येथील धुंदलवाडी, हळदपाडा, बहारे, वंकास यांसारख्या भागात भूकंपाचे हादरे बसत आहेत. काही दिवसांपासुन भूकंपाचे धक्के बंद झाल्याने या भागातील नागरीकांना दिलासा मिळाला होता. मात्र 12 ... Read More »

पतंजलिचे योग शिक्षक प्रशिक्षण संपन्न

राजतंत्र न्युज नेटवर्क/डहाणू दि. 15 : पतंजलि योग समिती (डहाणू) व लायन्स क्लब ऑफ डहाणू यांच्यातर्फे योगाचा प्रचार व प्रसार केला जातो आहे. विविध वयोगटातील स्त्री-पुरुषांबरोबरच विद्यार्थ्यांना देखील योगासनांचे धडे दिले जातात. या कार्यासाठी योगशिक्षक उपलब्ध व्हावेत याकरिता प्रशिक्षण वर्ग आयोजीत केले जातात. 14 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीत डहाणूतील काँग्रेस भवन येथे अशा प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले. ... Read More »

डहाणू : वरवाडा आश्रम शाळेतील विद्यार्थीनीची आत्महत्या

वार्ताहर/डहाणू, दि. 1 : डहाणू तालुक्यातील घाट (पाटीलपाडा) येथील कु. सारिका रघु पाटकर या 16 वर्षीय विद्यार्थीनीने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सारिका ही वरवाडा आश्रम शाळेत इयत्ता अकरावीच्या विज्ञान शाखेमध्ये शिक्षण घेत होती. मात्र अभ्यास झेपत नसल्याने तिने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. डहाणू तालुक्यातील पाटीलपाडा येथील चार मैत्रिणींनी आपले दहावीपर्यंतचे एकत्र शिक्षण ... Read More »

डहाणू विधानसभा मतदारसंघ भाजप राखणार की गमावणार?

रेशनिंग दुकाने आधारशी जोडल्यानंतर रेशनिंगच्या व्यवसायाला मर्यादा आल्या आहेत. प्रतिकूल परिस्थितीशी तोंड देताना राज्यातील शेतकर्‍यांवर आत्महत्या करण्याची वेळ येत आहे. मात्र रेशनिंग, शेती आणि हॉटेल हा व्यवसाय करणार्‍या धनारे यांची श्रीमंती अनेक पटीने वाढली आहे. त्यांच्या या प्रगतीबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. Read More »

Scroll To Top