दिनांक 11 December 2018 वेळ 12:11 AM
Breaking News
You are here: Home » Tag Archives: संजीव जोशी

Tag Archives: संजीव जोशी

कास पठारावर गवसलेले बालपण

Kaas Edited 1

या सहलीत सामील झालो नसतो तर ती चूक ठरली असती असे प्रत्येकाला वाटले. ही सहल म्हणजे एक मेडीटेशनच होते. जे सहलीत आले नाहीत त्यांनाही ते न आल्याची रुखरुख नक्कीच वाटेल. सर्गसौंदर्याने नटलेल्या, मिनी माथेरान म्हणून ओळख असलेल्या जव्हार मध्ये माझे प्राथमिक शिक्षण झाले. जव्हार मध्ये एसएससी पर्यंतचे शिक्षण घेणारे आम्ही तीस-पस्तीस मित्र-मैत्रिणी एकमेकांच्या संपर्कात असतो. यातले काहीजण अजून परस्परांना भेटू ... Read More »

मुलींनी स्वतःला सक्षम नागरिक म्हणून घडवावे – संजीव जोशी

Rajtantra_EPAPER_100918_1_100923

राजतंत्र न्यूज नेटवर्क डहाणू दि. ९: मुलींनी मोठे होताहोता दुर्बल किंवा बिचारी बाई नव्हे तर सक्षम नागरिक म्हणून स्वतःला घडवावे असे प्रतिपादन दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव जोशी यांनी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील विद्यार्थीनींशी बोलताना केले. त्यांनी विद्यार्थीनींना भारतीय संविधानाची तोंडओळख करुन दिली. डहाणू एज्युकेशन ट्रस्टचे उपाध्यक्ष सुधीर कामत यांनीदेखील विद्यार्थीनींना मार्गदर्शन केले.  संजीव जोशी यांनी भारतीय संविधानाची तोंडओळख करुन देण्याचे ... Read More »

फेक न्यूज : परिणाम आणि दक्षता या विषयावर जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यशाळा संपन्न

FAKE NEWS KARYASHALA

राजतंत्र न्युज नेटवर्क             पालघर, दि. ०१ : काही समाजकंटकांकडून जाणूनबुजून फेक न्यूज पसरवण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असुन अशा फेक न्युजमुळे मागील काही महिन्यांत देशभरात जमावाने मारहाण केल्याच्या अनेक घटना घडल्या. यात अनेक निष्पाप लोकांना जिव देखील गमवावा लागला. या फेक न्यूज थांबवण्यासाठी विविध स्तरावर पावले उचलली जात असताना माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने तसेच ... Read More »

भगिनींनी स्वतःच्या अधिकाराविषयी जागृत राहिले पाहिजे! – संजीव जोशी

Jamshet 1

जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या वसंतवाडी शाळेमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रांगोळी स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, हळदी कुंकू अशा भरघोस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आदिवासी भगिनींची उपस्थिती लक्षणीय होती. यावेळी संवाद साधताना संजीव जोशी यांनी ११० वर्षांपासून चालत आलेली जागतिक महिला दिनाची परंपरा, इंग्लंडमध्ये महिलांना १९१८ मध्ये मिळालेला मतदानाचा अधिकार, त्यानंतर १९२० मध्ये अमेरिकेत महिलांना मिळालेला अधिकार, आपल्या भारत देशात स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेचच मिळालेला सर्वंकष असा समानतेचा अधिकार याबाबत आढावा घेतला. Read More »

जबरदस्तीने चिकु पिकवायचे?

डहाणू तालुक्यातील 11 हजार 250 एकर जागा बागायतीसाठी आरक्षित होणार? भाग 21 वा: जबरदस्तीने चिकु पिकवायचे? डहाणू तालुक्यासाठी मंजूरीच्या प्रतिक्षेत असलेल्या रिजनल प्लॅनमध्ये काय वाढून ठेवलंय हा एक मोठा प्रश्‍नच आहे. मुंबई उच्च न्यायालयाने हा प्लॅन मंजूर करण्यासाठी 30 जुलै 2015 ही अंतीम मुदत दिली होती. आता 10 ऑगस्ट 2015 रोजीच्या सुनावणीत हा रिजनल प्लॅन मंजूर झाला किंवा नाही ते ... Read More »

सौर उर्जा प्रदुषणकारी असते?

डहाणू सोलर पॉवर प्रोजेक्ट राजस्थानला का गेला? प्रकल्पाचा आर्थिक तपशिल मागणारे गोएंका कोण? भाग 20 वा : सौर उर्जा प्रदुषणकारी असते? रिलायन्स पॉवरची मालकी असलेल्या डहाणू सोलर पॉवर प्रा. ली. या कंपनीने डहाणू येथील थर्मल पॉवर प्रकल्पामध्येच 100 मेगावॅट क्षमतेचा सौर उर्जा प्रकल्प प्रस्तावित केला होता. सौर उर्जा प्रकल्प हा प्रदुषणमुक्त व हरीत वर्गवारीतील प्रकल्प मानला जातो. अपारंपारीक उर्जा निर्मीतीच्या बाबतीत ... Read More »

डहाणूचे नागरिक राष्ट्रीयदृष्ट्या महत्वाचे नाहीत?

प्राधिकरण पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी आहे? की डहाणूला प्रकल्पग्रस्त करुन मग पुनर्वसन करण्यासाठी? भाग 19 वा : डहाणूचे नागरिक राष्ट्रीयदृष्ट्या महत्वाचे नाहीत? डीएफसीसीआयच्या मालवाहू रेल्वे (डेडीकेटेड फ्रेट कॉरीडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडीया) प्रकल्पाला मान्यता देताना प्राधिकरणाने युएसएच्या सर्वोच्च न्यायालयाचा देखील संदर्भ दिला आहे. मान्यता आदेशातील पान क्र. 7 ते 13 मध्ये पर्यावरणाव्यतिरिक्त अनेक प्रश्‍नांची चर्चा केली आहे. आणि मग प्राधिकरणाने डीएफसीसीआयच्या 29 ... Read More »

गोएंका प्राधिकरणाला वरीष्ठ आहेत का?

डहाणू तालुक्याचा 7/12 डेबी गोएंकाच्या नावावर आहे का? डहाणूचा विकास गोएंकांच्या मर्जीनेच होणार का? भाग 18 वा : गोएंका प्राधिकरणाला वरीष्ठ आहेत का? मागील भागात डहाणूतून जेएनपीटी ते दादरी (उत्तर प्रदेश) अशा डीएफसीसीआयच्या मालवाहू रेल्वे (डेडीकेटेड फ्रेट कॉरीडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडीया) प्रकल्पाबाबत उल्लेख करुन काही प्रश्‍न उपस्थित करण्यात आले. प्राधिकरणाच्या या संदर्भातील व अन्य बाबतीतही कामकाजाचे निरिक्षण केल्यांनतर डहाणू तालुक्याचा ... Read More »

विकासाची भाषा म्हणजे पर्यावरणाला विरोध?

डहाणूच्या पर्यावरणाचे संरक्षण करण्यात प्राधिकरणाला अपयश विकासही नाही आणि पर्यावरणही नाही भाग 17 वा : विकासाची भाषा म्हणजे पर्यावरणाला विरोध?   1991 पासून जर पाहिले तर नोटिफिकेशनचा दोनच बाजूंनी विचार होताना दिसतो. एक तर पर्यावरणवाद; आणि दुसरा विकासाचा आग्रह! मधला मार्गच नाही. विकासाची भाषा करणारा माणूस निष्ठूर आहे. त्याला पर्यावरण नको. त्याला शुद्ध हवा नको. त्याला कॉंक्रिटचे जंगल हवे आहे. ... Read More »

डहाणू शहराचे खेडे करणार का?

शाळा, रुग्णालये व मुलभुत सुविधा कशा उभारणार? कुठे नेऊन ठेवणार आमचे डहाणू ? भाग 16 वा : डहाणू शहराचे खेडे करणार का? डहाणू नगरपालिका क्षेत्राला नव्या विकास नियंत्रण नियमावलीतुन वगळल्यामुळे नेमका कसा विकास अडणार आहे हे पहाण्यासाठी नव्या नियमावलीत काय तरतुदी केल्या आहेत ते पहावे लागेल. डहाणू शहरामध्ये (तालुक्यातही) तळ + 2 मजल्यांपेक्षा जास्त उंचीच्या इमारतींच्या बांधकामास परवानगी नाही. नव्या ... Read More »

Scroll To Top