दिनांक 03 July 2020 वेळ 5:00 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » जिओ केबलसाठी खोदाई, देवबांध-डोल्हारा घाटात रस्त्याचे कडे तुटले!

जिओ केबलसाठी खोदाई, देवबांध-डोल्हारा घाटात रस्त्याचे कडे तुटले!

  • आदिवासींच्या शेतीचेही नुकसान,
  • बांधकाम विभागाचा मज्जाव; तरीही खोदाई

दीपक गायकवाड/मोखाडा, दि. 28 : खोडाळा – मोखाडा दरम्यान रिलायन्स जिओ कंपनीचे भुमिगत केबल टाकण्याचे काम सरु आहे. यासाठी ठिकठिकाणी नव्याने मारलेली साईडपट्टी खोदण्यात आली आहे. तर धोकादायक वळणांवर देखील खोदाई करून केबल लाईन टाकण्याचे काम करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्याचे कडे तुटले असुन या रस्त्यावरून प्रवास करणे नवागतांसाठी अधिक जिकीरीचे आणि जीवावर बेतणारे ठरत आहे.

खोडाळा ते डोल्हारा हा अगोदरच अरूंद व बाजूला खोल दरी असलेला घाट आहे. या रस्त्याची चालू आर्थिक वर्षांत बर्‍याच ठिकाणी साईडपट्टी व डांबरीकरण अशी नुतनीकरणाची कामे करण्यात आलेली आहेत. या भागात रिलायन्स जिओ कंपनीकडून आता भुमिगत केबल लाईन टाकण्याचे काम सुरु असुन रस्त्याचे होणारे नुकसान पाहता येथे काम करण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मोखाडा उपविभागाने मज्जाव केला होता. मात्र कंपनीने बांधकाम विभागाचा हा आदेश पायदळी तुडवत काम पुर्ण केले आहे. या कामादरम्यान देवबांध-डोल्हारा घाटातील अनेक ठिकाणी रस्त्याचे कडे तुटल्याने तसेच साईडपट्टी खोदली गेल्याने रस्ता धोकादायक झाला आहे. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम उपविभागाने संबंधितांवर मोखाडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देखील दाखल केली होती. मात्र तरीही ही केबल लाईन टाकण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

तसेच अनेक भागात शेतकर्‍यांकडून कोणतीही पूर्व परवानगी न घेताच त्यांच्या खाजगी मालकी हक्कातील जमिनीतूनही केबल टाकण्याचे काम केले गेल्याने शेतकर्‍यांचे ऐन शेती हंगामात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेंड्याचीमेट पळसुंडा भागात मात्र वनविभागाने काम बंद केले असले तरी बहूतेक ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभाग व आदिवासी शेतकर्‍यांची बेमालुम फसवणूक करुन जिओने आपले काम पुर्ण केले आहे.

याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मोखाडा उपविभागाशी संपर्क साधला असता संबंधितांना प्रत्यक्ष ताकीद देऊनही काम सुरूच ठेवल्यामुळे पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आलेली आहे, असे सांगण्यात आले.

रिलायन्स जिओच्या खोदकामामुळे आदिवासींच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. संबंधित ठेकेदाराने आमच्याकडे जिल्हाधिकार्‍यांची व मुख्यमंत्र्यांची परवानगी आहे, असे शेतकर्‍यांना सांगुन त्यांच्या उपजावू शेतीतून खोदाई केली आहे. त्यामुळे बांधांचे व हंगामी शेतीच्या प्रचंड नुकसानीला येथील शेतकर्‍यांना सामोरे जावे लागणार असुन याबाबत पालघर जिल्हाधिकार्‍यांकडे दाद मागणार आहोत.
-बन्सी गोपाळ हमरे, सामाजिक कार्यकर्ते

Print Friendly, PDF & Email

comments

About Rajtantra

Scroll To Top