दिनांक 04 July 2020 वेळ 12:17 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » सेवा देणार्‍या प्रत्येकाने ग्राहकांचे हित जपावे!

सेवा देणार्‍या प्रत्येकाने ग्राहकांचे हित जपावे!

राज्य सल्लागार समितीचे अध्यक्ष अरूण देशपांडे यांचे आवाहन

राजतंत्र न्युज नेटवर्क/पालघर, दि. 27 : ग्राहकांचे हित जपणे हे सेवा देणार्‍या प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्यामध्ये काही त्रुटी आढळल्यास ग्राहकांनी संबंधित विभागांच्या उपलब्ध क्रमांकावर तक्रार दाखल करावी आणि शासनाच्या संबंधित विभागांनी त्याची तात्काळ दखल घेऊन तक्रार निवारण करावे, अशी सूचना राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष अरूण देशपांडे यांनी केली.

राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीने ग्राहकांना सेवा पुरविणार्‍या पालघर जिल्ह्यातील विविध विभागांच्या अधिकार्‍यांची गुरूवारी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेतली. त्यानंतर देशपांडे यांनी ग्राहक संरक्षणासाठी केल्या जाणार्‍या उपाययोजनांविषयी पत्रकारांशी संवाद साधला. समितीच्या कोकण विभागीय सदस्य श्रीमती दास्ताने, जिल्हा पुरवठा अधिकारी संजय अहिरे आदी यावेळी उपस्थित होते.

देशपांडे म्हणाले, नागरीकांची अन्न व औषध प्रशासन विभागाशी संबंधित तक्रार असल्यास विभागाने 1800222365 हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. यावर या दोन्ही विभागांशी संबंधित कोणतीही तक्रार नोंदवता येते. त्यावर 72 तासात झालेल्या कार्यवाहीबाबत संदेश दिला जातो. त्याचबरोबर वजन व मापे या विभागाशी संबंधित काही तक्रार असल्यास ती 9869691666 या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर अथवा 022-22622022 या क्रमांकावर नोंदविता येईल. विजेशी संबंधित कोणतीही तक्रार असल्यास महावितरणने देखील ग्राहकांसाठी टोल फ्री सेवा उपलब्ध करून दिली असून 18002003435 अथवा 18002333435 या क्रमांकांवर ग्राहकाला आपली तक्रार नोंदविता येऊ शकेल. यावर एक टोकन क्रमांक दिला जातो. याशिवाय पालघर विभागासाठी 7875760842 हा व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक असून वसई-विरार विभागासाठी 7875760601/02 हे क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

ग्राहकांना सेवा देणार्‍या प्रत्येक ठिकाणी ग्राहकांच्या दृष्टीने आवश्यक आणि गरजेच्या असणार्‍या बाबींचा फलक लावावा, असे देशपांडे यांनी सांगितले. आवेष्टित वस्तुंवर उत्पादकाचे नाव व पत्ता, वस्तूचे नाव, वजन, किंमत, उत्पादनाची तारीख, तक्रार कोठे करावी आदी बाबी असणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. ग्राहकांना असलेल्या अधिकारांमध्ये सुरक्षिततेचा अधिकार महत्त्वाचा असून त्यादृष्टीने शासनाच्या सर्व संबंधित विभागांनी ग्राहकांच्या तक्रारींची जबाबदारीने दखल घ्यावी, असे आवाहन करून ग्राहकांनी आपली तक्रार जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे दिल्यास त्याची देखील अवश्य दखल घेतली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

Print Friendly, PDF & Email

comments

About Rajtantra

Scroll To Top