दुचाकी चोरटे गजाआड, तीन दुचाकी हस्तगत

0
11

राजतंत्र न्युज नेटवर्क/वसई, दि. 27 : विरार येथून चोरीला गेलेल्या दुचाकीचा तपास करत स्थानिक गुन्हे शाखेच्या वसई युनिटने तीन जणांना अटक केली असुन त्यांच्याकडून अर्नाळा येथून चोरीला गेलेल्या दोन व काशिमिरा पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चोरीला गेलेली एक, अशा एकुण 3 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.

विरार पश्‍चिम भागात राहणार्‍या गंगाधर मधुकर पाटील यांची एम.एच.04/डी.एल. 6583 या क्रमांकाची पल्सर दुचाकी साई सोन बाईक पॉईंट या दुकानात दुरुस्तीला दिली असताना 16 जून रोजी चोरी झाली होती. याप्रकरणी त्यांनी अर्नाळा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या वसई युनिटमार्फत या गुन्ह्याचा तपास सुरु होता. आपल्या तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेने बलमाकुमार श्रीकृष्ण पासवान (वय 22), दिनेश विठ्ठल पवार (वय 18) व निलेश विजयशंकर पाल (वय 18) अशा तीन संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता तिघांनीही आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. यानंतर त्यांच्याकडून गंगाधर पाटील यांच्या पल्सरसह एक यामाहा एफझेड व एक बजाज कंपनीची दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे.

दरम्यान, तिन्ही आरोपींविरोधात अर्नाळा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असुन पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Print Friendly, PDF & Email

comments