दिनांक 08 December 2019 वेळ 9:16 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » नालासोपारा व वसईत जुगारींवर कारवाई, 5 जणांना अटक

नालासोपारा व वसईत जुगारींवर कारवाई, 5 जणांना अटक

राजतंत्र न्युज नेटवर्क/वसई, दि. 24 : नालासोपारा पश्‍चिमेत अवैधरित्या लॉटरी खेळवणार्‍या दोघांसह वसईतील एका मैदानावर जुगार खेळणारे तिघे अशा पाच जणांना पोलिसांनी संबंधित अड्ड्यांवर छापा टाकून अटक केली आहे.

नालासोपार्‍यातील लक्ष्मी लॉटरी सेंटर या दुकानात ऑनलाईन सरकारी लॉटरी न काढता चिठ्ठ्यांवर पेनाच्या सहाय्याने स्वत:च आकडेमोड करून बेकायदेशीर लॉटरी विक्री केली जात असल्याची माहिती नालासोपारा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सदर दुकानावर छापा टाकून ललीतकुमार प्रकाश पटेल (वय 21) व रूपेश उदयलाल पटेल
(वय 23) या दोघांना अटक केली. तर वसई पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी राहूल लोंढे यांना येथील चिमाजी आप्पा मैदानावरील पत्र्याच्या शेडमध्ये जुगाराचा डाव बसत असल्याची माहिती मिळाल्यानंतर टाकण्यात आलेल्या छापादरम्यान सुरेश नारायण झुंझुरके (वय 56), राजेश महादेव शिरूळकर (वय 46) व रामदास रंगनाथ देवरे (वय 63) अशा तिघांना अटक करण्यात आली आहे. अटक जुगारींविरोधात संबंधित पोलीस स्टेशनमध्ये मुंबई जुगार बंदी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असुन अधिक तपास करण्यात येत आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top