दिनांक 04 July 2020 वेळ 2:15 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » जव्हारच्या माजी नगराध्यक्षांकडून शहराला टँकरने पाणी पुरवठा

जव्हारच्या माजी नगराध्यक्षांकडून शहराला टँकरने पाणी पुरवठा

प्रतिनिधी/जव्हार, दि. 23 : 7 जूनपासून पाऊस आज येईल, उद्या येईल असं म्हणून सर्वत्र पावसाची प्रतिक्षा सुरु आहे. मात्र जून महिना अर्ध्याहून अधिक लोटला असतानाही पाऊस पडत नसल्याने जव्हार शहरात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे.

जव्हार शहराला पाणी पुरवठा करणारा जयसागर धरण पाऊस पडला नसल्यामुळे पूर्णपणे कोरडा पडला आहे. त्यामुळे जव्हारकरांना भीषण पाणी टंचाईला समोर जावे लागत असून, जव्हारचे माजी नगराध्यक्ष दिलीप तेंडूलकर यांनी समाजसेवेच्या वृत्तीतून 10 हजार लिटर क्षमतेचे टँकर दिवसातून तीन ते चार वेळा मोफत वाटप सुरु केले आहे. यामुळे काही प्रमाणात का होईना शहरवासियांना दिलासा मिळाला आहे.

शहरात कधी न भासवणारी पाणी टंचाई प्रशासनाचे पूर्वनियोजन नसल्यामुळे यंदा जाणवत आहे. माजी नगराध्यक्ष तेंडूलकर यांनी ही गंभीर बाब हेरून तातडीने दिवसातून शक्य तितके टँकर जव्हारहून 17 किमी अंतरावर असलेल्या वडोली येथील नदीतून पाणी भरून शहरात पुरवठा करीत आहेत. त्यामळे शहरात त्यांचे आभार मानले जात आहेत. तसेच यापूर्वी देखील खेडोपाड्यात टंचाई असताना तेंडूलकर यांनी पाणी पुरवठा केला होता.

Print Friendly, PDF & Email

comments

About Rajtantra

Scroll To Top