दिनांक 04 July 2020 वेळ 1:52 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » बँक ऑफ महाराष्ट्रच्या वाडा शाखेत शेतकरी मेळावा संपन्न!

बँक ऑफ महाराष्ट्रच्या वाडा शाखेत शेतकरी मेळावा संपन्न!

प्रतिनिधी/वाडा, दि. 23 : एक लाख रुपयांचे कर्ज घेऊन वर्षभराच्या आत या कर्जाची परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांना व्याज माफ असणार आहे, तर तीन लाखापर्यंतच्या कर्जाची वर्षभरात परतफेड केल्यास केवळ तीन टक्के व्याज आकारले जाईल, अशी माहिती बँक ऑफ महाराष्ट्रच्या वाडा शाखेच्या शाखा व्यवस्थापक रंजना भोईर यांनी दिली.

शेतकरी बांधवांना शेती, फळबाग, फुलबाग, गायी खरेदी, शेतीसाठी लागणारे अवजार खरेदी तसेच विहिर, बोअरवेल, ठिबक सिंचन यासाठी बँकेकडून दिल्या जाणार्‍या विविध कर्ज व सवलतींबाबत माहिती मिळावी व शेतकर्‍यांना या योजनांचा लाभ मिळावा यासाठी काल, शनिवारी बँक ऑफ महाराष्ट्रच्या वाडा शाखेत शेतकरी मेळाव्याचे आयोजन वाडा व मालवाडा शाखेच्या वतीने करण्यात आले होते. त्यावेळी भोईर बोलत होत्या.

या मेळाव्यात एकूण पाच शेतकर्‍यांना मंजूर झालेल्या कर्जाचा धनादेश देण्यात आला. तर आणखी 25 कर्जाचे अर्ज प्राप्त आले असून लवकरच त्यांनाही कर्ज देण्यात येईल, असे भोईर यांनी सांगितले. या मेळाव्यात तालुक्यातील अनेक शेतकर्‍यांनी सहभाग घेतला. याप्रसंगी मालवाडा शाखेचे व्यवस्थापक नरेंद्र म्हस्के, नगरसेवक रामचंद्र जाधव आदी उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email

comments

About Rajtantra

Scroll To Top