दिनांक 20 February 2020 वेळ 11:45 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » जिल्हा परिषद उपाध्यक्षांनी आणले बैलगाडीतून विद्यार्थी

जिल्हा परिषद उपाध्यक्षांनी आणले बैलगाडीतून विद्यार्थी

वाडा, दि. १७: शिक्षणाकडे विद्यार्थ्यांना ओढ निर्माण व्हावी म्हणून राज्यभर शाळा प्रवेशोत्सव साजरा करून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्याचा उपक्रम राबविण्यात येत असतांनाच पालघर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नीलेश गंधे यांनी वाडा तालुक्यातील विलकोस येथील प्राथमिक शाळेत नव्याने दाखल होत असलेल्या विद्यार्थ्यांना बैलगाडीत बसवून सारथ्य करत मिरवणुकीने शाळेत आणले. तर किरवली येथील कर्णबधिर शाळेतील विद्यार्थ्यांचेही शब्दाविन संवादू अशी आत्मिक भावना जोडून अनोखे स्वागत केल्याने या विशेष मुलांच्या भावविश्वाला आनंद दिला.

जिल्ह्यातील सुमारे २ हजार दोनशे शाळांमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षांसह सर्व पदाधिकाऱ्यांनी विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत केले. उपाध्यक्ष गंधे यांनी वाडा तालुक्यातील विलकोससह वाडा शाळा क्रमांक २ , विवेकनगर आदी शाळांना भेटी देवून विद्यार्थ्यांचे पुष्प देवून स्वागत केले. गणवेश व पुस्तकांचे देखिल वाटप केले विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. तर किरवली येथील कर्णबधिर विद्यार्थ्यांना रंगपेटी, चॉकलेटचे वाटप करत ह्या विशेष विद्यार्थ्यांमध्येही आनंदाची पेरणी त्यांनी केली.
यावेळी जिल्ह्यातील बाविसशे शाळांमध्ये शाळाप्रवेश साजरा झाला असून आगामी काळात शिक्षण समिती, जिल्हा परिषद पालघर व सर्व पंचायत समितीच्या माध्यमातून शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करून विद्यार्थी चांगल्याप्रकारे शिकतील असा विश्वास गंधे यांनी व्यक्त केला तर नवजीवन कर्णबधिर शाळा, किरवली ही संस्था खूप चांगल्याप्रकारे काम करत असून दिवसेंदिवस विद्यार्थीसंख्याही वाढत आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कर्णबधिर विद्यार्थ्यांसह अन्य दिव्यांगांकरिता भरीव निधीची तरतूद करण्यात आली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

comments

About Rajtantra

Scroll To Top