दिनांक 23 July 2019 वेळ 4:52 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » आंबे तोडल्याच्या रागातून सख्ख्या भावाचा खून

आंबे तोडल्याच्या रागातून सख्ख्या भावाचा खून

वाडा, दि. १७: झाडावरील आंबे तोडल्याचा राग मनात बाळगून जयवंत पाटील या इसमाने सख्ख्या भावाचा खून केल्याच्या आरोपाखाली वाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाडा तालुक्यातील पालसाई येथे रहाणाऱ्या जयवंत पाटील याचा भाऊ दिलीप पाटील याने (बुधवार, दि. १२ रोजी) घराच्या पाठीमागे असलेल्या आंब्याच्या झाडाचे आंबे पाडल्याचा राग मनात धरून जयवंतने त्याला जाब विचारला व दांडूक्याने मारहाण केली. या मारहाणीत दिलीप पाटीलच्या डोक्याला जबर इजा झाली. त्यांना वाडा ग्रामीण रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी मुंबई येथील जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले असता दुसऱ्या दिवशी दिलीप यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. यानंतर वाडा पोलीस ठाण्यात जयवंत पाटील व त्यांची पत्नी जयश्री जयवंत पाटील यांच्या विरोधात खूनाच्यक आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक गोविंद बोराडे तपास करीत आहेत. याप्रकरणी आरोपींना अजून अटक करण्यासाठी आलेली नाही.

comments

About Rajtantra

Scroll To Top