दिनांक 18 November 2019 वेळ 2:02 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » जिल्हा परिषद शाळांचे प्रवेशोत्सव साजरे 

जिल्हा परिषद शाळांचे प्रवेशोत्सव साजरे 

पालघर, दि. १७: प्राथमिक शाळांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी गोडी निर्माण व्हावी याकरिता त्यांचे पहिल्या दिवशी जंगी स्वागत करण्यात येते. पालघर तालुक्यातील हनुमान नगरच्या जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना फुगे लावून सजवून आणलेल्या कारमधून वाजत गाजत शाळेत आणून प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला .

अशा प्रयत्नांतून पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची उपस्थिती 90 टक्के दिसून आली. विद्यार्थ्यांची वाजतगाजत प्रभातफेरी काढण्यात आली. विद्यार्थ्यांना नवीन पुस्तके, वह्या, तसेच नवीन दप्तर व चॉकलेट वाटप करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या तथा पत्रकार वैदेही वाढाण, पत्रकार हेमेन्द्र पाटील यांनी देखील प्रवेशोत्सवाला हजेरी लावून प्रोत्साहन दिले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप पाटील, भूमिका पिंपळे, कपिल संखे, सिद्धेश्वर मुंढे व विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते .

comments

About Rajtantra

Scroll To Top