दिनांक 20 February 2020 वेळ 12:00 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » वसई-सावंतवाडी पॅसेंजर सुरु करा, खासदार गावितांचे रेल्वेला पत्र

वसई-सावंतवाडी पॅसेंजर सुरु करा, खासदार गावितांचे रेल्वेला पत्र

खा. राजेंद्र गावित

वार्ताहर/बोईसर, दि. 16 : वसई-सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटना मागील अनेक महिन्यांपासुन वसई-सावंतवाडी रातराणी पॅसेंजर गाडी नियमित सुरू व्हावी, यासाठी वारंवार पाठपुरावा करत आहे. ही मागणी लक्षात घेता पालघर जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार राजेंद्र गावित यांनी पश्चिम रेल्वेच्या महाप्रबंधक यांना पत्र देऊन लवकरात लवकर वसई सावंतवाडी रातरानी पॅसेंजर सुरू करण्याची मागणी केली आहे.

वसई, नालासोपारा, विरार, पालघर, बोईसर तसेच डहाणू भागामध्ये नोकरीनिमित्ताने मोठ्या संख्येने कोकण भागातील नागरिक स्थायिक झाले आहेत. हे कोकणवासीय जरी येथे स्थायिक झाले असले तरी गणपती, दिवाळी तसेच मे महिन्याच्या सुट्ट्यांमध्ये आवर्जून ते कोकणामध्ये आपल्या गावी जात असतात. त्याचप्रमाणे कोकण हे संपूर्ण पर्यटन स्थळ असल्याने कोकण दर्शनासाठी जाणार्‍या पर्यटकांना देखील या गाडीचा लाभ घेता येईल. सध्या कोकणात जायचं असेल तर डहाणू, पालघर, बोईसर सारख्या भागातील नागरिकांना मुंबई येथे जाऊन गाडी पकडावी लागत आहे. हा त्रास वाचावा याकरिता वसई-सावंतवाडी पॅसेंजर रातरानी नियमित सुरू करावी, अशी मागणी खासदार गावित यांनी रेल्वे विभागाकडे केली आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top