दिनांक 20 February 2020 वेळ 9:49 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांचा राजीनामा

आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांचा राजीनामा

राजतंत्र न्यूज नेटवर्क/डहाणू, दि. 16 : राज्याचे आदिवासी विकास मंत्री, तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री विष्णू सवरा यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या काही महिन्यांपासून सवरा प्रकृती अस्वास्थ्यामुळे सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये फारसे उपस्थित रहात नसत. मंत्रीमंडळ बैठकीला देखील ते उपस्थित राहू शकत नव्हते. त्यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी त्यांना मंत्रीमंडळाची फेररचना होईपर्यंत मंत्रीपदावर राहण्याची सूचना केली होती. आज मंत्रीमंडळ फेररचना झाल्यानंतर विष्णू सवरा हे पायाउतार झाले. येत्या काही दिवसांत ते शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल होणार आहेत.

comments

About Rajtantra

Scroll To Top