दिनांक 23 July 2019 वेळ 5:13 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » रोटरी क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्ट तर्फे गंजाड येथे मुलींसाठी सुसज्ज वसतीगृह

रोटरी क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्ट तर्फे गंजाड येथे मुलींसाठी सुसज्ज वसतीगृह

राजतंत्र न्यूज नेटवर्क/डहाणू, दि. १६ : रोटरी क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्ट तर्फे डहाणू तालुक्यातील गंजाड येथे शिक्षण प्रसारक मंडळाच्या आश्रमशाळेतील आदिवासी विद्यार्थिनींसाठी सुसज्ज असे वसतीगृह बांधून देण्यात आले आहे. आज रोटरी क्लब (बॉम्बे एअरपोर्ट) चे अध्यक्ष सुकेतू जरीवाला, डायरेक्टर मोहन जैन, सचिव कनीर भाटीया, आमदार आनंद ठाकूर, आमदार अमित घोडा, माजी आमदार शंकर नम यांच्या प्रमुख उपस्थितीत या वसतीगृहाचे उद्घाटन करण्यात आले. वसतीगृहामध्ये स्वच्छतागृहे, अभ्यासिका यांसह सर्व सुविधा पुरविण्यात आल्या असून गरम पाण्यासाठी सौर उर्जेचा वापर केला जाणार आहे. रोटरी क्लब तर्फे या शाळेत २ प्रशस्त वर्ग खोल्या देखील बांधून देण्यात आल्या आहेत. कार्यक्रमाला मुंबई येथून रोटरी क्लबचे सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित राहिले होते.

comments

About Rajtantra

Scroll To Top