
राजतंत्र न्युज नेटवर्क/डहाणू, दि. १४: नृतिहि इन्स्टिट्यूट ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स या भरतनाट्यम प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेतून नाट्यकला शिकणाऱ्या कु. गिरिजा पाटील आणि कु. देवश्री कर्णिक या 2 विद्यार्थीनींना एसएससी परिक्षेमध्ये वाढीव गुणांचा फायदा झाला आहे. त्यामुळे गुणांची सरासरी वाढण्यास मदत झाली आहे. नालंदा डान्स रिसर्च सेंटरशी संलग्न असलेल्या या संस्थेच्या डहाणूसह, बोईसर, पालघर व बोरीवली येथे शाखा आहेत. यामुळे भरतनाट्यम सारखी नृत्यकला शिकण्याची संधी उपलब्ध झालेली आहे.

भरतनाट्यम या नृत्यप्रकारामुळे शारिरीक व मानसिक संतुलन राखण्यास मदत होतेच, याशिवायही अनेक फायदे होतात. एकाग्रता वाढण्यासही सहाय्य होते. अशा कलागुणांच्या विकासाने सर्वांगीण विकास साधण्यास मदत होते. यामुळे लोकांनी स्वतःमधील कलागुणांना वाव द्यायला हवा अशी अपेक्षा संस्थेच्या संचालिका प्रज्ञा काजलिया यांनी राजतंत्रशी बोलताना व्यक्त केली आहे.