दिनांक 25 August 2019 वेळ 2:26 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » वाड्यात पुन्हा चोरी; फार्मच्या कर्मचार्‍यांना मारहाण करुन हजारोंचा ऐवज लुटला

वाड्यात पुन्हा चोरी; फार्मच्या कर्मचार्‍यांना मारहाण करुन हजारोंचा ऐवज लुटला

प्रतिनिधी/वाडा, दि. 14 : तालुक्यात चोरींच्या घटना थांबण्याचे नाव घेत नसुन आता सापणे बुद्रुक येथील मनिष राठी यांच्या शुभमान फार्म फार्ममधील बंगल्यामध्ये चोरट्यांनी चोरी केली आहे. चोरट्यांनी चोरी करण्यापुर्वी येथील कर्मचार्‍यांना बांधून मारहाण करत 18 हजार रुपयांची रोख रक्कम व देव्हार्‍यातील चांदीच्या मूर्ती लंपास केल्या आहेत.

सापणे बुद्रुक येथील पिंजाळ नदीकिनारी शुभमान फार्म असून येथे फॉर्मचे मालक मनिष राठी यांचा बंगला आहे. फार्ममध्ये काम करण्यासाठी चार परप्रांतीय कामगार असून सदर कर्मचारी रात्रीच्या दरम्यान बंगल्यात झोपले असताना 12 ते 15 चोरट्यांनी खिडकीमधून बंगल्यात प्रवेश केला. यातील काही चोरट्यांनी कर्मचार्‍यांना मारहाण करुन त्यांचे हातपाय बांधले व त्यानंतर कपाटे, पलंग खोलून पैसे शोधण्याचा प्रयत्न केला. यावेळी बंगल्यामध्ये रोख रक्कम न भेटल्यामुळे त्यांनी कर्मचार्‍यांना पुन्हा मारहाण करत त्यांच्याकडे असलेली 18 हजार रुपयांची रोख रक्कम लुटली तसेच देव्हार्‍यातील देवाच्या चांदीच्या मुर्त्यांची चोरी करून पसार झाले. वाडा पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

ग्रामीण तसेच शहरी भागातील सततच्या वाढत्या चोर्‍यांमुळे तालुक्यातील नागरिकांत भितीचे वतावरण निर्माण झाले असून चोरांचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्याची मागणी तालुक्यातील नागरिकांकडून होत आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top