सैन्य दलात अधिकारी पदाच्या सुवर्णसंधी!

0
18

सीडीएस मुलाखतीच्या तयारीसाठी 18 जूनपासून मोफत निवासी प्रशिक्षण

राजतंत्र न्युज नेटवर्क/मुंबई, दि. 14 : संघ लोकसेवा आयोग (UPSC) यांच्यामार्फत सीडीएस
(Combined Defense Services) परीक्षा 8 सप्टेंबर 2019 रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी कोणत्याही शाखेच्या पदवीधराला अर्ज करता येणार असून या परीक्षेसाठीचा संघ लोक सेवा आयोगाकडे ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख 8 जुलै आहे. या परीक्षेची जाहिरात 12 जूनच्या एम्प्लॉयमेंट न्यूज पेपर आणि संघ लोकसेवा आयोगाच्या वेबसाईटवरही उपलब्ध आहे.

सीडीएस परीक्षेची पूर्व तयारी करुन घेण्यासाठी नाशिक रोड येथील छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र येथे प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला आहे. या प्रशिक्षण वर्गाचा कालावधी 18 जून ते 31 ऑगस्ट असा आहे. अधिक माहितीसाठी नाशिक रोड येथील छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्राचे प्रभारी अधिकारी यांच्याशी 0253-2451031 किंवा 2451032 या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत (स. 10 ते सायं. 5.30) संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक अधिकारी मुंबई शहर यांनी केले आहे.

Print Friendly, PDF & Email

comments