मोखाडा : उकळती डाळ पत्नीवर ओतली

0
18
  • महिला गंभीररित्या भाजली
  • आरोपी पतीविरोधात गुन्हा दाखल

राजतंत्र न्युज नेटवर्क/मोखाडा, दि. 14 : मद्यधुंत पतीने जेवणावरुन उद्भवलेल्या वादातून पत्नीला बेदम मारहाण करत तिच्या अंगावर उकळती डाळ ओतल्याचा प्रकार मोखाडा येथे घडला असुन यात सदर महिला गंभीररित्या भाजली आहे. तर हे अमानुष कृत्य करणार्‍या पतीविरोधात मोखाडा पोलीस स्टेशनमध्ये हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

12 जून रोजी संध्याकाळी 6 वाजेच्या सुमारास पीडित 38 वर्षीय महिला चुलीवर डाळ शिजवत ठेऊन भाजी चिरत असताना तिचा पती मद्यधुंद अवस्थेत घरी पोहोचला. यावेळी त्याने पत्नी अजून भाजी चिरत असल्याचे पाहून तु आतापर्यंत जेवन का बनवले नाही, असे म्हणत तिच्यासोबत वाद घातला व तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. पुढे ऐवढ्यावरच न थांबता त्याने चुलीवर डाळ शिजत असलेला टोप उचलून तिच्या अंगावर ओतला. यात सदर महिलेचा चेहरा, हात व पोट गंभीररित्या भाजले असुन या अमानुष कृत्याप्रकरणी आरोपी पतीविरोधात मोखाडा पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड विधान संहितेचे कलम 307,504,506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोखाडा पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

Print Friendly, PDF & Email

comments