दिनांक 21 September 2019 वेळ 5:51 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » कुडूसमध्ये आयडीबीआय बँकेचे एटीएम फोडून 10 लाख लांबवले!

कुडूसमध्ये आयडीबीआय बँकेचे एटीएम फोडून 10 लाख लांबवले!

प्रतिनिधी/वाडा, दि. 13 : तालुक्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असुन रोजच कुठे ना कुठे चोरीच्या घटना घडू लागल्याने संपूर्ण तालुक्यात भीतीचे सावट पसरले आहे. दोन दिवसांपुर्वींच मिठाईच्या दुकानातील 15 लाखांची रोकड लंपास केल्याची घटना ताजी असतानाच काल, बुधवारी रात्री कुडूस येथील आयडीबीआय बँकेचे एटीएम फोडून सुमारे दहा लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी लांबवल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील मोठी बाजारपेठ असलेल्या भिवंडी-वाडा महामार्गावरील कुडूस येथे आयडीबीआय बँकेची शाखा असून या शोखेच्या इमारतीतच तळमजल्यावर बँकेचे एटीएम मशीन आहे. काल रात्री चोरट्यांनी गॅस कटरचा वापर करून हे एटीएम मशीन फोडले. यावेळी मशीनमध्ये सुमारे 10 लाख रूपयांची रोकड असल्याचा अंदाज बँक प्रशासनाने वर्तवला असून चोरट्यांनी संपुर्ण रोकड लंपास केली आहे.

दरम्यान, वाडा तालुक्यात गेल्या महिनाभरात खुपरी, वावेघर, डाकिवली, वाडा, बिलघर, कंचाड आदी गावांमध्ये घरफोड्या होऊन मोठ्या प्रमाणावर ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. मात्र या चोर्‍या रोखण्यात पोलीस प्रशासनाला अपयश आल्याने चोरींच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यातच 11 जून रोजी वाड्यातील मिठाईच्या दुकानातून लांबवलेले 15 लाख व एटीएममधुन 10 लाख लंपास केल्याच्या घटना शहराच्या मुख्य रस्त्यालगतच घडल्याने नागरिकांत प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top