दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू!

0
12

प्रतिनिधी/वाडा, दि.13 : दुचाकीवरून भरधाव वेगात भोपीवलीहून गालतरेला जात असताना दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या विजेच्या खांबावर आदळल्याने झालेल्या अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. सागर किसन डुकले (वय 21) असे सदर तरुणाचे नाव असुन या अपघाताची वाडा पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली आहे.

मांडा-भोपिवली येथे राहणारा सागर हा गालतरे येथे कामाला होता. रात्रपाळी असल्याने तो काल, बुधवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास एम.एच.48/एम.व्ही. 7623 या क्रमांकाच्या आपल्या होंडा शाईन गाडीवरून कामाला जात असताना आपटी येथे त्याचे भरधाव गाडीवरील नियंत्रण सुटले व तो थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या विजेच्या खांबाला जाऊन धडकला. यात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.

Print Friendly, PDF & Email

comments