दिनांक 19 June 2019 वेळ 2:38 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » दहावी आणि बारावीच्या पुरवणी परिक्षा 17 जुलैपासून

दहावी आणि बारावीच्या पुरवणी परिक्षा 17 जुलैपासून

राजतंत्र न्युज नेटवर्क/मुंबई, दि. 12 : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (दहावी) आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) पुरवणी परीक्षा येत्या 17 जुलैपासून घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या 9 विभागीय मंडळामार्फत या परिक्षा घेण्यात येतील.

दहावीची पुरवणी लेखी परिक्षा 17 जुलैपासून 30 जुलैपर्यंत घेण्यात येईल. तर बारावीची पुरवणी लेखी परीक्षा 17 जुलैपासून 3 ऑगस्टपर्यंत घेण्यात येईल. तसेच बारावी व्यवसाय अभ्यासक्रम पुरवणी लेखी परीक्षा 17 जुलैपासून 31 जुलैपर्यंत घेण्यात येईल. इयत्ता दहावी आणि बारावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी व तोंडी परीक्षा 9 जुलै ते 16 जुलै दरम्यान घेण्यात येणार आहेत. परीक्षेचे वेळापत्रक मंडळाच्या ुुु.ारहरहीीललेरीव.ारहरीरीहींीर.र्सेीं.ळप या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी असून परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा/ उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालय यांच्याकडे विभागीय मंडळामार्फत छापील स्वरुपात दिलेले वेळापत्रक अंतिम असेल, अशी माहिती मंडळातर्फे देण्यात आली आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top