दिनांक 19 June 2019 वेळ 3:11 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » मिठाईच्या दुकानात १५ लाखांची चोरी

मिठाईच्या दुकानात १५ लाखांची चोरी

दुकानात काम करणार्‍या तरुणावर संशय

प्रतिनिधी/वाडा, दि. 12 : वाडा बसस्थानकानजीक असलेल्या वाडा स्वीट्स मार्ट या दुकानात रात्रीच्या सुमारास चोरी झाली असून दुकानातील पंधरा लाख रुपये रोख चोरीला गेले असल्याची माहिती दुकान मालक मोहनराम चौधरी यांनी सांगितले. वाडा स्वीट्स मार्ट या दुकानात मालकासह इतर तिघे नौकर काम करत असून यापैकी एकजण सकाळ पासून दुकानात आला नसल्याने व दुकानाचे शटर किंवा कुलुप न तोडता ते चावी लावून उघडले होते. त्यामुळे ही चोरी त्यानेच केली असावी, असा संशय चौधरी यांनी व्यक्त केला आहे. रोख पंधरा लाख रुपयांसह दुकानातील दोन सीसीटीव्ही कॅमेरे, डिव्हीआर व स्क्रीनही चोरीला गेले असल्याचे चौधरी यांनी सांगितले. या बाबत वाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून अधिक तपास वाडा पोलीस करत आहेत.

comments

About Rajtantra

Scroll To Top