दिनांक 26 May 2020 वेळ 5:21 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » टंचाईग्रस्त खोडाळ्याला शिवसेनेकडून मोफत पाणी वाटप

टंचाईग्रस्त खोडाळ्याला शिवसेनेकडून मोफत पाणी वाटप

प्रतिनिधी/मोखाडा, दि. 12 : 1980 च्या दशकानंतर प्रथमच भीषण पाणी टंचाईशी सामना करणार्‍या खोडाळा शहराला शिनसेनेने मदतीचा हात दिला आहे. आजमितीस खोडाळा शहरात शिवसेनेच्या खोडाळा शाखेमार्फत दररोज पाच टँकर पाणी पुरवठा केला जात असल्याने रहिवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

खोडाळा शहराला पाणी पुरवठा करणार्‍या एकमेव तलावातील पाणी तलावाच्या नुतनीकरणासाठी सोडून देण्यात आले होते. त्यामुळे ऐन अखेरच्या काळात सन 1980 च्या दशकातील पाणी टंचाईची अनूभुती घेत पदरमोड करून विकतचे पाणी घेणार्‍या तमाम ग्रामस्थांना शिवसेनेच्या पाणी पुरवठ्यामूळे कमालीचा दिलासा मिळाला आहे. याकामी शिवसेनेचे विक्रमगड विधानसभा संघटक प्रल्हाद कदम, जिल्हा परिषद गटनेते प्रकाश निकम, सभापती प्रदीप वाघ, तालुका प्रमुख अमोल पाटील, खोडाळ्याचे सरपंच प्रभाकर पाटील आणि उपसरपंच मनोज कदम यांनी मोलाचे सहकार्य केलेले आहे.

राष्ट्रवादीही मदतीस धावली
जव्हार-मोखाड्यातील पाणीटंचाईची झळ कमी करण्यासाठी पालघर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसनेही 7 टँकर उपलब्ध करून देऊन मोलाचा हातभार लावला आहे. या कार्यात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील भुसारा, जव्हारचे अध्यक्ष कमळाकर धुम, विक्रमगड विधानसभा अध्यक्ष प्रमोद कोठेकर यांचे विशेष योगदान लाभलेले आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top