दिनांक 30 May 2020 वेळ 9:35 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » विक्रमगड पोलिसांची कर्तव्यदक्षता, बेपत्ता मुलीचा 5 तासात शोध

विक्रमगड पोलिसांची कर्तव्यदक्षता, बेपत्ता मुलीचा 5 तासात शोध

राजतंत्र न्युज नेटवर्क/विक्रमगड, दि. 11 : बाजारात जाण्यासाठी घरातून बाहेर पडलेल्या व बेपत्ता झालेल्या 11 वर्षीय मुलीचा अवघ्या पाच तासांच्या आत शोध घेण्यात विक्रमगड पोलिसांना यश आले असुन पोलिसांच्या या कर्तव्यदक्षतेचे कौतूक होत आहे.

विक्रमगड तालुक्यातील शेवते ठाकुरपाडा येथील महेश पोट्या गोवींद यांची 11 वर्षीय मुलगी करीना 5 जून रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास बाजारात जाण्यासाठी घरातून बाहेर पडली होती. मात्र अनेक तास उलटूनही घरी परतली नव्हती. तिच्या कुटूंबियांनी पुढील दोन दिवस तिचा सर्वत्र शोध घेतला मात्र ती मिळून आली नाही. अखेर 8 जून रोजी तिच्या वडिलांनी विक्रमगड पोलीस स्टेशनमध्ये करीनाचे अपहरण झाल्याबाबत तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी तत्काळ वेगवेगळी पथके तयार करुन आपला तपास सुरु केला असता करीना विक्रमगड-जव्हार रस्त्यावर एकटीच चालत असताना पोलिसांच्या एका पथकाला आढळून आली. पोलिसांनी तात्काळ तिला ताब्यात घेत सुखरुप तिच्या आईवडिलाकंडे सोपवले आहे.

दरम्यान, तक्रार दाखल झाल्याच्या पाच तासांच्या आतच पोलिसांनी बेपत्ता झालेल्या करीनाचा शोध घेतल्याने पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेचे कौतूक होत आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top