दिनांक 19 June 2019 वेळ 3:15 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » तलासरी : विविध अपघातात 2 ठार

तलासरी : विविध अपघातात 2 ठार

राजतंत्र न्युज नेटवर्क/तलासरी, दि. 11 : येथे काल, सोमवारी घडलेल्या 2 वेगवेगळ्या अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला आहे. यात एका ट्रकचालकाचा तर एका पादचार्‍याचा समावेश आहे.

काल, संध्याकाळी 4.30 च्या सुमारास डी.डी.03/के. 9342 या क्रमाकांच्या ट्रकने एम.एच.12/आर.एन.0468 या क्रमांकाच्या 35 वर्षीय ट्रकचालकाला धडक दिल्याने सदर ट्रकचालकाचा जागीच मृत्यू झाला. तर दुसर्‍या घटनेत रात्री 8 वाजेच्या सुमारास रस्त्याच्या कडेने पायी प्रवास करणार्‍या एका 45 वर्षीय व्यक्तीला मागून भरधाव वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी संबंधितांविरुद्ध तलासरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास करण्यात येत आहे.

दरम्यान, विरारमधील अर्नाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीत 2 जून रोजी घडलेल्या एका अपघातात गंभीर जखमी झालेल्या 57 वर्षीय इसमाचा काल, 10 जून रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अज्ञात कारचालकाने धडक दिल्याने हा अपघात झाला होता.

comments

About Rajtantra

Scroll To Top