दिनांक 25 May 2020 वेळ 12:19 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू!

विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू!

प्रतिनिधी/वाडा, दि. 10 : घरातील विद्युत पुरवठा खंडित झाल्याने स्विच बोर्ड तपासत असताना विजेचा जोरदार झटका लागून 27 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना तालुक्यातील कंचाडपासून काही अंतरावर असलेल्या शेलरपाडा येथे घडली आहे.

शेलारपाडा येथील एकनाथ झिपर शेलार हा तरुण आज, मंगळवारी सकाळी झोपेतुन उठला असता घरातील विद्युत पुरवठा खंडित झाल्याचे त्याचे लक्षात आले. यावेळी त्याने वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी घरातील स्विच बोर्ड उघडून तपासत असतानाच त्यातील एक तुटून लोंबकळत असलेल्या वायरच्या तो संपर्कात आला व विजेचा जोरदार धक्का बसल्याने तो जागीच कोसळला. हा प्रकार लक्षात येताच त्याला तात्काळ वाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे डॉ. प्रदीप जाधव यांनी त्याला तपासुन मृत घोषित केले.

एकनाथ हा मेहनती व घरातील कमावता व्यक्ती होता. तो टेम्पो चालवून परिवाराचा उदरनिर्वाह करत होता. त्याच्यामागे आई, पत्नी व दोन मुली असा परिवार आहे. एक वर्षांपूर्वीच त्याच्या वडिलाचे निधन झाले आहे. घरातील कमावती व्यक्ती तिही अगदी तरुण वयात मृत्यू पावल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top