दिनांक 19 June 2019 वेळ 2:44 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » विरार : जुगार अड्ड्यावर छापा, 12 जुगारी अटकेत

विरार : जुगार अड्ड्यावर छापा, 12 जुगारी अटकेत

राजतंत्र न्युज नेटवर्क/विरार, दि. 10 : येथील कारगिलनगर भागात असलेल्या राजश्री भिम ऑनलाईन या जुगाराच्या अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या वसई युनिटने छापा मारत 12 जुगार्‍यांना अटक केली आहे. तसेच त्यांच्याकडील साडेसात हजारांची रक्कम जप्त केली आहे.

अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी, 8 जुन रोजी पोलिसांनी ही कारवाई केली असुन राजेश कन्हैया गुप्ता (वय 46), सर्फराज नजिर अहमद शेख (वय 30), योगेश अशोक रांधावन (वय 30), दौलत भुपत ओगानीया (वय 20), संतोष सिताराम घानेकर (वय 40), सौरभ मोहन त्रिलोटकर (वय 23), भरत रमेश गोहिल (वय 34 वर्ष), संजय सदानंद खैरे (वय 38), सुरेश तुकाराम अफनकर (वय 51), रवि अन्ना जाधव (वय 31), महेश मंजी वाघेला (वय 36), सुनिल रामचंद्र नवलाखे (वय 48) अशा 12 जणांना अटक केली असुन त्यांच्याविरूद्ध विरार पोलीस स्टेशनमध्ये मुंबई जुगार कायद्याचे कलम 4(ब), 12(अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top