दिनांक 21 September 2019 वेळ 6:00 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » किरकोळ कारणावरून सख्ख्या भावाचा खून!

किरकोळ कारणावरून सख्ख्या भावाचा खून!

वाडा येथील घटना; आरोपीस तात्काळ अटक

प्रतिनिधी/वाडा, दि. 10 : वडिलांच्या घरी पत्नीसह येऊन झोपल्याचा राग मनात धरून सख्ख्या थोरल्या भावाने धाकट्या भावाच्या डोक्यात लाकडी दांडक्याने हल्ला करुन त्याला जीवे ठार मारल्याची घटना वाडा तालुक्यात घडली आहे. आरोपी भावाला तत्काळ अटक करण्यात आली आहे.

तालुक्यातील साईदेवळी-आपटी येथील कातकरी पाडा येथे सांबरे कुटुंबियांचे घर असून शनिवारी रात्री शरद मधुकर सांबरे हा आपल्या पत्नीसह वडिलांच्या घरी झोपायला आला होता. हे पाहून संतापलेला त्याचा थोरला भाऊ रविंद्र सांबरेने रागाच्या भरात दोघांना झोपेतून उठवले व शिवीगाळ केली असता ते दोघे घरातून बाहेर जात असतानाच त्याने लाडकी दांडक्याने शरद सांबरेच्या डोक्यात जोरदार प्रहार केला. यात शरद सांबरे (वय 32) याचा जागीच मृत्यू झाला.

याबाबत खबर मिळताच वाडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुदाम शिंदे यांनी तात्काळ तीन पथके तयार करून आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता तालुक्यातील एनशेत येथे आरोपी लपला असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरुन आरोपीला तत्काळ अटक करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक शिंदे याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

comments

About Rajtantra

Scroll To Top