डहाणू : सेवानिवृत्त कर्मचारी संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न!

0
358

प्रतिनिधी/डहाणू, दि. 10 : सेवा निवृत्त कर्मचारी संघाच्या डहाणू विभागाची 12 वी वार्षिक सर्वसाधारण सभा काल, रविवारी (9 जून) सकाळी 10 वाजता आगर जिल्हा परिषद शाळा येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून संघाचे डहाणू विभाग अध्यक्ष मुरलीधर माच्छी, डहाणू तालुका अध्यक्ष मारुती वाघमारे व सरचिटणीस बापुराव देवकर उपस्थित होते.

प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दिप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. संघाचे डहाणू विभाग उपाध्यक्ष बाबुभाई जोंधळेकर यांनी प्रास्ताविक करताना संघाच्या कार्याची सविस्तर माहिती दिली. याप्रसंगी अमृत वर्षांत पदार्पण केलेल्या जेष्ठ सभासदांचा व उत्कृष्ठ सेवानिवृत्त कर्मचार्‍यांचा सत्कार करण्यात आला. उपस्थित सभासदांपैकी, शैक्षणिक क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांच्या आजी-आजोबांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना, मारुती वाघमारे यांनी संघटनेच्या शक्तीचे महत्व विशद करुन सगळ्यांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. तसेच संघटनेतर्फे कर्मचार्‍यांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी होत असलेल्या कामाबाबत सविस्तर माहिती उपस्थितांना करून दिली. शेवटी सन 2019 ते 2022 या कालावधीसाठी नविन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. सौ. शैलजा पाटील व श्रीमती जयश्री ठाकूर यांनी सुत्रसंचालन केले.

Print Friendly, PDF & Email

comments