दिनांक 25 May 2020 वेळ 1:22 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » अरबी समुद्रात चक्रीवादळाचे संकेत, मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन

अरबी समुद्रात चक्रीवादळाचे संकेत, मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन

राजतंत्र न्युज नेटवर्क/मुंबई, दि.9 : भारताच्या पश्चिम-किनारपट्टीजवळ असलेल्या अरबी समुद्रात एक चक्रीवादळ तयार होण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. 11 व 12 जून दरम्यान हे चक्रीवादळ राज्याच्या किनारपट्टीपासून सुमारे 300 किलोमीटर दूर राहील.

हे चक्रीवादळ राज्यात धडकण्याची शक्यता नाही, परंतु त्याच्या प्रभावामुळे या कालखंडात किनारपट्टीवर वार्‍याचा वेग वाढलेला दिसेल. चक्रीवादळाच्या जवळ असलेला समुद्र अधिक खवळलेला राहील, तर किनारपट्टीजवळ समुद्र काही प्रमाणात खवळलेला दिसेल. या दरम्यान कोकणासह मुंबईमध्ये पावसाच्या सरी कोसळतील, असे मत हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. सुरक्षितेसाठी मच्छीमारांनी 11 व 12 जून रोजी अरबी समुद्रात जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top