वाड्यात घरफोडीचे सत्र सुरुच; विवेकनगर येथून लाखोंचा ऐवज लंपास

0
8

प्रतिनिधी/वाडा, दि. 9 : वाड्यात मागील काही महिन्यांपासुन चोरट्यांनी धुडघूस घातला असुन आता विवेकनगर येथील सुबोध वेखंडे यांच्या घरात चोरट्यांनी घरफोडी करत लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.

शनिवारी मध्यरात्री ही घटना घडली असुन चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचा टाळा तोडून घरात प्रवेश करत 4 जोड सोन्याचे कर्णफुले, सोन्याच्या दोन चेन, तीन मोबाईल असा लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला असल्याची माहिती सुबोध वेखंडे यांनी दिली. रस्त्यावरील दोन खांबांवरील पथदिवे बंद असल्याने या ठिकाणी अंधार असतो. याचाच फायदा घेत चोरट्यांनी आपल्या घरावर डल्ला मारला आहे. तरी नगरपंचायतीने लवकरात लवकर हे पथदिवे चालू करावेत, अशी मागणी या घटनेनंतर वेखंडे यांनी केली आहे.

वेखंडे परिवार काही कामानिमित्त पुणे येथे गेले असताना घरात कोणीच नसल्याचा फायदा घेत शनिवारी रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी ही चोरी केली. वेखंडे यांनी याबाबत वाडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून वाडा पोलीस अधिक तपास करत आहेत.

Print Friendly, PDF & Email

comments