दिनांक 21 September 2019 वेळ 6:13 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » डहाणू : एकाच दोरीने गळफास घेऊन तरुण व विवाहितेची आत्महत्या

डहाणू : एकाच दोरीने गळफास घेऊन तरुण व विवाहितेची आत्महत्या

राजतंत्र न्यूज नेटवर्क/ डहाणू, दि. 6 : आगवण नवासाखरापाडा येथील एका शेतात एक तरुण व विवाहितेचा मृतदेह आढळून आला असुन या दोघांनी शेतातील एका झाडाला एकाच दोरीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे.

आगवण नवासाखरापाडा येथील नितीन यशवंत बालशी (वय 24) हा तरुण काल, 6 जुन रोजी कुणाला काहीएक न सांगता घरातून बाहेर पडला होता. नितीन उशिरापर्यंत घरी न पोहोचल्याने त्याच्या घरच्यांनी त्याचा शोध घेतला असता त्यांच्याच शेतातील आपट्याच्या झाडाला नितीन व एक महिला दोरीच्या साहाय्याने घळफास घतलेल्या अवस्थेत नितीनच्या मोठ्या भावाला दिसुन आले. नितीनसोबत आत्महत्या केलेली महिला विवाहित असुन ममता शाम धापशी (वय 24, रा. पालघर लोकमान्य नगर) असे तीचे नाव आहे. पोलिसांना याबाबत खबर मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले. तसेच याप्रकरणी डहाणू पोलीस स्टेशनमध्ये अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असुन पोलीस या आत्महत्येमागचे कारण शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत.

comments

About Rajtantra

Scroll To Top