दिनांक 21 September 2019 वेळ 6:37 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » किनारपट्टीवर संशयित बोट आढळल्याच्या अफवेवर विश्‍वास न ठेवण्याचे आवाहन

किनारपट्टीवर संशयित बोट आढळल्याच्या अफवेवर विश्‍वास न ठेवण्याचे आवाहन

  • किनार्‍यावर सुरक्षारक्षक तैनात!
  • अप्पर पोलीस अधिक्षक योगेश चव्हाण यांची माहिती!

वार्ताहर/बोईसर, दि. 31 : पालघर जिल्ह्यातील समुद्र हद्दीत संशयास्पद बोट आढळून आली आहे, अशी अफवा सर्वत्र पसरली आहे. मात्र अशी कोणतीही संशयास्पद बोट सागरी किनारी आढळून आली नसल्याचे पालघर पोलिसांनी स्पष्ट केले आहे. तर समुद्रात अशा काही संशयास्पद हालचाली आढळल्यास पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करतानाच सतर्कतेचा इशाराही पोलिसांमार्फत देण्यात आला आहे.

रीलंकेत साखळी बाँम्बस्फोट घडवून आणणार्‍या दहशतवाद्यांना मोहम्मद मिरसा नावाच्या व्यक्तीने महाकाय बोटीत आश्रय दिलेला असुन ही बोट सध्या समुद्रात फिरत असल्याचे वृत्त होते. त्यातच पालघर जिल्ह्याच्या किनारपट्टीवर एक संशयीत बोट आढळल्याच्या चर्चेने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्‍वभुमीवर जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक योगेश चव्हाण यांनी नुकतीच पोलीस अधीक्षक कार्यालयात इंटेलिजन्स ब्युरो, सीआयडी, गुन्हे अन्वेषण विभाग, दहशतवादी विरोधी पथक, कोस्टगार्ड, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, मत्स्यव्यवसाय विभाग, सर्व सागरी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी, मच्छिमार संस्थांचे प्रतिनिधी यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत जिल्ह्याच्या सागरी हद्दीत रात्रं-दिवस विशेष सुरक्षा अभियान राबवण्यात आले असुन कोणतीही संशयास्पद बोट आढळून न आल्याचे स्पष्ट करण्यात आले. तसेच खरबदारी म्हणून सर्तकतेचा इशारा देण्यात आला.

किनारी भागात आणि समुद्रात संशयित हालचालीवर पाळत ठेवण्याकरिता सागरी पोलीस दल तैनात ठेवण्यात आलेले असुन सागरी मार्गाने मोठ्या प्रमाणात जहाजांद्वारे वाहतूक होत असते. या वाहतुकीदरम्यान काही संशयास्पद आढळल्यास त्यावर बारीक नजर ठेवण्याच्या सूचना सागरी पोलीस दलाला देण्यात आल्या आहेत. तसेच समुद्रामध्ये किंवा समुद्र किनार्‍यावर संशयास्पद हालचाली आढळल्यास संबंधितांनी 1554 या मुंबई किनार सुरक्षा कक्ष अथवा 025255151 या पालघर जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षाक्षी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top