दिनांक 21 September 2019 वेळ 6:08 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » बोईसर : नागझरीजवळ मोठी दुर्घटना टळली!

बोईसर : नागझरीजवळ मोठी दुर्घटना टळली!

गॅस सिलिंडर भरलेला ट्रक उलटला

वार्ताहर/बोईसर, दि. 28 : मुंबईवरून बोईसरला 56 हायड्रोजन गॅस सिलिंडर घेऊन येणारा एक ट्रक नागझरीजवळ पलटी झाल्याची घटना आज पहाटे सव्वा तीन वाजताच्या सुमारास घडली. सुदैवाने ट्रकमधील कोणत्याही सिलिंडरमधुन गॅसगळती न झाल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र गॅस सिलिंडरने भरलेला ट्रक पलटी झाल्याची खबर पसरल्याने परिसरात एकच धावपळ उडाली होती. या अपघातात ट्रकचालक किरकोळ जखमी झाला आहे.

बोईसर शहराला मुंबई-अहमदाबाद महामार्गाशी जोडणार्‍या बोईसर-चिल्हार रस्त्याचे मागील 2 वर्षांपासुन रुंदीकरणाचे काम सुरु आहे. रुंदीकरणाच्या या कामासाठी अनेक ठिकाणी खोदकाम करण्यात आले आहे. आज मुंबईहून एम.एच.03/एल.पी. 9617 या क्रमांकाच्या ट्रकमधुन बोईसर औद्योगिक क्षेत्रातील टाटा स्टील कंपनीमध्ये 56 हायड्रोजन गॅस सिलिंडर नेले जात होते. पहाटे सव्वा तीनच्या सुमारास हा ट्रक बोईसर-चिल्हार रस्त्यावरील नागझरी येथे आला असता येथील खोदकामामुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले व ट्रक रस्त्यावर पलटी झाला. यात ट्रकचा चालक किरकोळ जखमी झाला आहे. विशेष म्हणजे ट्रक पलटी झालेल्या ठिकाणापासून दोन्ही बाजूंनी 100 फूट अंतरावर दोन पेट्रोल पंप होते. सुदैवाने ट्रकचा वेग जास्त नसल्याने ट्रकमधील एकही गॅस सिलिंडरमधुन गॅस गळती न झाल्याने मोठा अनर्थ टळला.

दरम्यान, सिलिंडरने भरलेला ट्रक पलटी झाल्याने घटनास्थळी बघ्यांची गर्दी होती. तर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता घटनास्थळी अग्निशमन दलाची एक गाडी व पोलिस लक्ष ठेवून होते.

comments

About Rajtantra

Scroll To Top