दिनांक 19 June 2019 वेळ 2:09 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » वाडा : पिशवी फाडून लाखोंचा ऐवज चोरला

वाडा : पिशवी फाडून लाखोंचा ऐवज चोरला

राजतंत्र न्यूज नेटवर्क/वाडा, दि. 26 : तालुक्यातील कुडूस येथील बाजारात बाजार करण्यासाठी आलेल्या एका महिलेच्या नकळत तिच्या हातातील पिशवी फाडून त्यातील 1 लाख 63 हजार रुपयांचा ऐवज चोरी केल्याची घटना घडली आहे. अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 24 मे रोजी सकाळी पावणे बाराच्या सुमारास सापने येथील रहिवासी असलेली 43 वर्षीय महिला कुडूस बाजारपेठेत बाजार करण्यासाठी आली होती. यावेळी तीने बाजार करण्यासाठी आणलेल्या पिशवीत आपले 1 लाख 35 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे गंठण, 25 हजार रुपयांची रोख रक्कम व 3 हजार रुपये किंमतीचा मोबाईल ठेवला होता. मात्र सदर महिला बाजार करण्यात व्यस्त असताना एका भामट्याने नकळत तिच्या हातातील पिशवी फाडून त्यातील गंठण, रोख रक्कम व मोबाईल लंपास केला. हा प्रकार समजल्यानंतर महिलेने वाडा पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत तक्रार नोंदवली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला असुन पोलीस अधिक तपास करत आहेत.

comments

About Rajtantra

Scroll To Top