दिनांक 21 September 2019 वेळ 6:06 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » तलासरीत भारतीय मजदूर संघाची कार्यकारणी बैठक संपन्न!

तलासरीत भारतीय मजदूर संघाची कार्यकारणी बैठक संपन्न!

हरिश्चंद्र लक्ष्मण कापसे यांची तालुकाध्यक्षपदी निवड झाली

प्रतिनिधी/तलासरी, दि. 26 : भारतीय मजदूर संघटनेच्या वतीने तलासरी तालुक्याची पहिली नवीन कार्यकारणीची बैठक आज, रविवारी विश्व हिंदू परिषद आश्रमात महाराष्ट्र राज्याचे असंघटित कामगार संघाचे मोहन पवार आणि पालघर जिल्ह्याचे सचिव चंद्रकांत नेवे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी विजवितरण महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष कु. निर्मला माह्यावंशी, सह सचिव संतोष वरठा यांची उपस्थिती होती. या बैठकीत तलासरी तालुक्याकरिता नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली.

या बैठकीत मजदूर संघाच्या प्रार्थनेनंतर पुढील कार्यास सुरुवात करण्यात आली. यावेळी नेवे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना संघटनेची उदिष्टे व कार्याबद्दल माहिती दिली. तर संघाचे नवनिर्वाचित तलासरी तालुकाध्यक्ष हरिश्चंद्र कापसे यांनी प्रयत्नाची पराकाष्टा करून तालुक्यात संघटनेचे कार्य वाढवावे, अशा शुभेच्छा सर्वांनी दिल्या.

नवीन कार्यकारणी खालीलप्रमाणे ;
तालुकाध्यक्ष :- हरिश्चंद्र लक्ष्मण कापसे
सचिव :- सुनील बुजड
उपाध्यक्ष :- शैलैश बाबू पाहू
खजिनदार :- कु. निर्मला माह्यावंशी
संघटक :- सचिन उंबरसाडा
कार्यालय प्रमुख :- राजू गोडकर
सदस्य :- विलास धनारे, सदू धनारे

comments

About Rajtantra

Scroll To Top