दिनांक 21 September 2019 वेळ 6:35 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » वाड्यातील केतन जाधवने केले एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत

वाड्यातील केतन जाधवने केले एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत

पालकमंत्री विष्णु सवरा यांच्याकडून अभिनंदन

राजतंत्र न्यूज नेटवर्क/पालघर, दि 25 मे : वाडा तालुक्यातील माधवराव काणे अनुदानित आश्रम शाळा, देवगाव येथील केतन सीताराम जाधव या अकरावी इयत्तेतील आदिवासी विद्यार्थ्याने जगातील सर्वात उंच माउंट एव्हरेस्ट शिखर 23 मे रोजी पहाटे 5 वाजुन 10 मिनिटांनी पादाक्रांत केले. त्याच्या या कामगिरीबद्दल आदिवासी विकास मंत्री तथा पालक मंत्री विष्णु सवरा यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.

राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाने हाती घेतलेल्या मिशन शौर्य 2019 या एव्हरेस्ट मोहिमेत केतन जाधव याच्यासह एकूण नऊ आदिवासी विद्यार्थ्यांची निवड झाली होती. विविध ठिकाणी घेतलेल्या खडतर प्रशिक्षणानंतर हा चमू एव्हरेस्ट पादाक्रांत करण्यासाठी गेला होता. 23 मे रोजी भल्या पहाटे या नऊ आदिवासी विद्यार्थ्यांनी एव्हरेस्ट शिखर सर करून इतिहास घडवला आहे. सुग्रीव, सुरज, अंतुबाई, चंद्रकला, मनोहर, मुन्ना, अनिल, हेमलता आणि केतन अशी ही मोहीम यशस्वी केलेल्या नऊ एव्हरेस्ट विरांची नावे आहेत.

या धवल यशाबद्दल या सर्वांचे अभिनंदन करण्याबरोबरच मोहीम पूर्ण करण्यात योगदान दिलेल्या आदिवासी विकास विभागातील सर्व अधिकार्‍यांचे सवरा यांनी आभार मानले आहेत.

comments

About Rajtantra

Scroll To Top