दिनांक 21 September 2019 वेळ 5:51 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » भरधाव ट्रकने दोघांना उडवले, 1 ठार

भरधाव ट्रकने दोघांना उडवले, 1 ठार

राजतंत्र न्यूज नेटवर्क/तलासरी, दि. 24 : येथे भरधाव वेगात असलेल्या एका ट्रकने दोन जणांना धडक दिल्याने एकाचा ट्रकखाली चिरडून जागीच मृत्यू झाला. तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे. अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काल, 23 मे रोजी 11.30 च्या सुमारास ही घटना घडली. तलासरी तालुक्यातील काजळी गावाच्या हद्दीत 2 इसम रस्त्याच्या कडेने पायी चालत असताना भरधाव वेगात काजळीहून आमगावच्या दिशेने जाणार्‍या जी.जे. 15/ए.टी. 2320 या क्रमांकाच्या ट्रकने दोघांना जोरदार धडक दिली. यातील एकाच्या डोक्यावरुन ट्रकचे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा गंभीर जखमी झाला असुन त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, याप्रकरणी तलासरी पोलिसांनी संबंधित ट्रकच्या चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असुन अधिक तपास सुरु आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top