दिनांक 19 June 2019 वेळ 2:17 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » नालासोपार्‍यात 6 वर्षीय मुलीवर बलात्कार

नालासोपार्‍यात 6 वर्षीय मुलीवर बलात्कार

जाब विचारणार्‍या पीडितेच्या पित्याला मारहाण

राजतंत्र न्यूज नेटवर्क/नालासोपारा, दि. 24 : नालासोपारा येथे 6 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची तसेच याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या तिच्या पित्याला आरोपीने शिविगाळ करत मारहाण केल्याची घटना घडली आहे. पीडितेच्या आईने याबाबत तुळींज पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली असुन त्यानुसार आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार, पीडित मुलगी 22 मे रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास आपल्या इमारतीच्या गॅलरीत खेळत असताना आरोपीने तिला जबरदस्तीने इमारतीच्या टॅरेसकडे जाणार्‍या जिन्यावर नेले व तिच्यावर बलात्कार केला. आरोपीच्या या दुष्कर्मानंतर पीडित मुलीने हा प्रकार आपल्या कुटूंबियांना सांगितल्यानंतर याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या पीडितेच्या पित्याला आरोपीने शिविगाळ करत मारहाण केल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आला आहे. दरम्यान, याप्रकरणी आरोपीविरोधात तुळींज पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड विधान संहितेचे कलम 376,323,504,506 सह पोस्को कायद्याचे कलम 4,8 व 12 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास सुरु आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top