दिनांक 21 September 2019 वेळ 5:55 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » विवाहितेचा अमानुष छळ, सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा

विवाहितेचा अमानुष छळ, सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा

राजतंत्र न्यूज नेटवर्क/नालासोपारा, दि. 22 : अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेऊन त्याची व्हिडीओ क्लिप बनवून ती व्हायरल करण्याची धमकी देत विवाहितेला गर्भपात करण्यास प्रवृत्त करणार्‍या पतीसह घरगुती कारणांवरुन अमानुष छळ करणार्‍या तिच्या सासरच्या मंडळीविरोधात नालासोपारा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, 5 महिन्यांपुर्वी ती गरोदर असताना तिच्या पतीने अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेऊन त्याची व्हिडीओ क्लिप बनवली होती. तसेच या क्लिपचा वापर करुन त्याच्यासह सासु, सासरे व दोन्ही नंदा तिला गर्भपात करण्यास प्रवृत्त करत होते. तर बाळंतपणाच्या खर्चासाठी ठेवलेले पैसे तसेच लग्नात माहेरकडून मिळालेल्या दागिन्यांचा देखील सासरच्या मंडळीने परस्पर अपहार केल्याचे पीडितेने आपल्या फिर्यादीत म्हटले आहे. या सर्व प्रकारातून तसेच घरगुती वादातून होणार्‍या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून अखेर पीडितेने याबाबत नालासोपारा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असुन त्यानुसार पोलिसांनी विवाहितेचा पती, सासु-सासरे व दोन्ही नंदांविरोधात भारतीय दंड विधान संहितेचे कलम 377, 315, 498 (अ), 323, 504, 506(2), 34 सह माहिती व तंत्रज्ञान अधिनियमचे कलम 66(ब) नुसार गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास चालु आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top