दिनांक 21 September 2019 वेळ 6:13 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » मोखाड्यातील दोन टंचाईगस्त गावांना दिगंतचा आधार

मोखाड्यातील दोन टंचाईगस्त गावांना दिगंतचा आधार

सौरऊर्जेचा वापर करून केला जातोय पाणीपुरवठा

प्रतिनिधी/जव्हार, दि. 22 : मोखाडा तालुक्यातील पर्जन्यमान हे अतिवृष्टी (2400 मिमी) प्रवर्गात येत असले तरीही जानेवारी-फेब्रुवारी महिन्यापासून पाणी टंचाई, तर एप्रिलमध्ये बहुसंख्य गावपाड्यांना टँकरने पाणीपुरवठा हा विरोधाभास हे या तालुक्यातील वास्तव आहे. दुसरीकडे तालुक्यातून 7 नद्या वाहतात आणि तीन मध्यम लघुसिंचन प्रकल्प असताना त्यातील कोट्यावधी लिटर पाणी अनेक दशकांपासून असेच पडून आहे. विजेची कमतरता आणि पाईप किंवा कॅनॉलचे विस्कळीत जाळे यामुळे येथील पाण्यासाठ्यातून पाणी उचलच होत नाही.

या पार्श्वभूमीवर तालुक्यातील चिकनपाडा (चास ग्राप) व धामोडी (आसे) या पाणी टंचाईसोबत दशकांपासून झुंजत असलेल्या पाड्यांवर पाणी पुरवठा करण्याचे काम दिगंत स्वराज फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आले आहे. या दोन्ही गावांसाठी दरीतून पाणी उचल करण्यात आले आहे. महत्त्वाचं म्हणजे चिकन पाड्यात 1.5 किमी खोल दरीतून तर धामोडीमध्ये 3 किमी खोल दरीतून सौरऊर्जेचा वापर करून पाणी उचल करण्यात येत आहे. याकरिता निंबस या कलकत्त्यातील कंपनीने तांत्रिकदृष्ट्या प्रकल्प उभारणीचे शिवधनुष्य पेलले. त्यामुळे आज या गावात पिण्यासाठी शुद्ध पाणी व शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे.

या प्रकल्पाकरीता ए.एस.बी. इंटरनॅशनल या कंपनीने त्यांच्या सी.एस.आर. मधुन निधी उपलब्ध करून दिला आणि राव व गार्गी यांनी वैयक्तिक पातळीवर सहभाग घेत प्रकल्पाबाबत मार्गदर्शन केले. दिगंत स्वराज फाउंडेशनचे जयेश महाले, दिलीप बोढेरे, वसंत व यादव कोरडे यांनी ग्रामस्थांसोबत अथक परिश्रम करून या प्रकल्पाची उभारणी केली आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top