दिनांक 21 September 2019 वेळ 6:39 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » नालासोपाऱ्यात 1.2 कोटींचा मांडूळ साप जप्त; दोघे अटकेत

नालासोपाऱ्यात 1.2 कोटींचा मांडूळ साप जप्त; दोघे अटकेत

फाईल छायाचित्र

राजतंत्र न्यूज नेटवर्क/मनोर, दि. 3 : महिन्याभरापुर्वीच मनोरमधील गोवाडे गावातून दिड कोटी किंमतीचे दुर्मिळ असे मांडूळ प्रजातीचे दोन साप पालघर स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केल्याची घटना ताजी असतानाच आता नालासोपारा येथून पोलिसांनी आणखी 1 कोटी 20 लाख रुपये किंमतीचा मांडूळ साप जप्त केला आहे. तसेच याप्रकरणी दोन जणांना अटक केली आहे. काळी जादू व औषधासाठी मांडूळ प्रजातीच्या सापांना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.

शशांत योगेश मोदलीयर (वय 32) व मोसीन रहीम कुरेशी (वय 30) हे दोघे काळा जादूसाठी मांडूळ सापाची तस्करी करणार असल्याची माहिती पालघर स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीवरुन नालासोपारा रेल्वे स्टेशनच्या बाहेर गेल्या शनिवारी (दि. 18) संध्याकाळी 7.15 वाजेच्या सुमारास पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले असता त्यांच्याकडे 4 फूट लांब व अंदाजे दिड किलो वजनी मांडूळ साप आढळून आला. या मांडूळाची बाजारभावानुसार 1 कोटी 20 लाख रुपये किंमत असल्याचे समजते. दरम्यान, यानंतर पोलिसांनी मांडूळ जप्त करत दोन्ही आरोपींविरोधात वन्यजीव संरक्षक अधिनियम 1972 चे कलम 39(3) सह कलम 51 नुसार गुन्हा दाखल केला असुन दोघांनाही रात्री उशिरा अटक करण्यात आली.

comments

About Rajtantra

Scroll To Top