दिनांक 21 September 2019 वेळ 6:31 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » ट्रकखाली चिरडून शाळकरी मुलाचा मृत्यू

ट्रकखाली चिरडून शाळकरी मुलाचा मृत्यू

प्रतिनिधी/वाडा, दि. 19 : तालुक्यातील खानिवली येथून क्लास सुटल्यानंतर सायकलवरून घरी परतत असताना मागून येणार्‍या ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात कौशल दिनेश पाटील (वय15) या शाळकरी मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे.

कौशल हा इयत्ता दहावीचा विद्यार्थी असून तो खानिवली येथे क्लासला जात होता. शनिवारी दूपारच्या सुमारास क्लास सुटल्यानंतर अंबिस्ते (जांभ्याचा पाडा) येथील आपल्या घरी परतत असताना पाठीमागून येणार्‍या एम.एच.05 के.8895 या क्रमांकाच्या ट्रकने कौशलच्या सायकलला धडक दिली. या धडकेमुळे रस्त्यावर कोसळलेला कौशल ट्रकखाली चिरडला गेल्याने त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दरम्यान, धडकेनंतर ट्रकसह पळून गेलेला ट्रकचालक काही अंतरावर ट्रक सोडून फरार झाला आहे. वाडा पोलीस अधिक तपास करत आहेत.

comments

About Rajtantra

Scroll To Top