दिनांक 21 July 2019 वेळ 5:39 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » वाड्यात दुचाकी अपघातात 35 वर्षीय इसम जागीच ठार

वाड्यात दुचाकी अपघातात 35 वर्षीय इसम जागीच ठार

प्रतिनिधी/वाडा, दि. 17 : तालुक्यातील खुपरी येथे झालेल्या अपघातात एका इसमाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली. दीपक श्रीधर वावरे (वय 35, रा.जामघर) असे सदर इसमाचे नाव असून ते विलास परशुराम बहारे याच्यासोबत एम.एच.04/ ई.ए.5951 या क्रमांकाच्या दुचाकीवरून कुडूस येथील आठवडा बाजारात खरेदीसाठी गेले होते. बाजारहाट करून घरी परतत असताना मागून येणार्‍या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीचालक बहारे व मागे बसलेले वावरे रस्त्यावर कोसळले. यावेळी वावरे यांच्या डोक्यावरून धडक देणार्‍या गाडीचे चाक गेल्याने डोक्याचा चेंदामेंदा होऊन त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीचालक विलास बहारे हा गाडी सोडून पळून गेला असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे. याप्रकरणी वाडा पोलीस अधिक तपास करत आहेत.

comments

About Rajtantra

Scroll To Top