दिनांक 30 May 2020 वेळ 8:43 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » वाडा : विद्युत खांबांना लाकडी बांबूंचा आधार

वाडा : विद्युत खांबांना लाकडी बांबूंचा आधार

प्रतिनिधी/वाडा, दि. 17 : तालुक्यातील कांबारे ग्रामपंचायत हद्दीतील साठेपाडा ते जाधवपाडा दरम्यान वीजवितरण कंपनीने टाकलेल्या विद्युतवाहक लाईनची अत्यंत दुरावस्था झाली असून ग्रामस्थांनी वारंवार तक्रारी करूनही वीज वितरण कंपनी याकडे डोळेझाक करत असल्याचा आरोप आहे. तर या लाईनसाठी वापरण्यात आलेले सिमेंटचे खांब जीर्ण झाल्याने कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून स्थानिक नागरिकांनी अशा खांबांना पर्यायी लाकडी बांबूंचा आधार दिला आहे.

कांबारे ग्रामपंचायत हद्दीतील माळीपाडा, नडगेपाडा व जाधवपाडा येथील नागरिकांना जीर्ण खांबांच्या प्रश्‍नासह वीज वितरण कंपनीच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असुन या पाड्यांवरील जवळपास 70 ते 75 घरांना वीज वितरण कंपनीतर्फे नवीन विद्युत मीटर बसवून देण्यात आले आहे. मात्र या नवीन मीटरमध्ये अजुनपर्यंत विद्युत जोडणी करण्यात आली नसतानाही या वीज ग्राहकांना मीटर भाड्याचा नाहक भुर्दंड सोसावा लागत आहे. तर मागील दोन वर्षांपासून माळीपाडा येथील ट्रान्सफार्मर बंद अवस्थेत असुन तो त्वरीत सुरू करावा, साठेपाडा ते जाधवपाडा दरम्यानच्या विद्युतवाहक लाईनची तात्काळ दुरुस्ती करून नवीन खांब बसविण्यात यावेत अशी मागणी ग्रामस्थ संतोष साठे, सुरेश नडगे, भरत वरठा, शांताराम बसवंत, कैलास माळी, किसन नडगे यांनी एका निवेदनाद्वारे वीज वितरण कार्यालयाकडे केली आहे.

दरम्यान वीज वितरण कंपनीकडे नवीन खांब उपलब्ध नसल्याने आम्ही ते तूर्त बसवू शकत नाही. खांब उपलब्ध होताच ते तात्काळ बसविले जातील. तर नवीन मीटर धारकांची नवीन लाईनवरुनच विद्युत जोडणी केली जावी, अशी मागणी असल्याने त्यांना कनेक्शन देण्यात आलेले नाही, अशी प्रतिक्रिया वीजवितरण कंपनीचे उप अभियंता ज्ञानेश्वर वट्टमवार यांनी दिली.

comments

About Rajtantra

Scroll To Top