दिनांक 25 May 2019 वेळ 11:17 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » अखेर वादग्रस्त वनअधिकारी दिलीप तोंडे यांची बदली

अखेर वादग्रस्त वनअधिकारी दिलीप तोंडे यांची बदली

श्रमजीवी संघटनेच्या आंदोलनाला आले यश

फाईल छायाचित्र

प्रतिनिधी/वाडा, दि. 17 : शासनाच्या वृक्षलागवड अभियानांतर्गत खड्डे खोदण्याचे काम केलेल्या, मात्र या कामाची मजूरी न मिळाल्याने यासंदर्भात विचारणा करण्यासाठी गेलेल्या आदिवासी मजुरांवर पिस्तुल रोखून धमकावल्याचा कथित आरोप असलेले प्रभारी वन परिक्षेत्र अधिकारी दिलीप तोंडे यांची अखेर बदली करण्यात आली आहे. श्रमजीवी संघटनेने तोंडे यांच्या कार्यशैलीविरोधात गेल्या सोमवारी (दि. 13) वाडा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर आसूड मोर्चा काढला होता. या आंदोलनाची दखल घेत वनअधिकारी तोंडे यांची बदली करण्यात आली असल्याचे बोलले जात आहे.

वनअधिकारी दिलीप तोंडे यांची विक्रमगड येथील वनक्षेत्र अधिकारी म्हणून नियुक्ती असुन त्यांच्याकडे वाडा पश्चिम विभागाचा अतिरिक्त प्रभार देण्यात आला होता. मात्र डिसेंबर 2018 दरम्यान वाडा वनविभाग (पश्चिम) कार्यालयाच्या क्षेत्रात वृक्ष लागवड करण्यासाठी खड्डे खोदण्याचे काम केलेल्या काही आदिवासी मजुरांना या कामाची मजूरी न मिळाल्याने यांसदर्भात विचारणा करण्यासाठी गेलेल्या या मजुरांवर वनअधिकारी तोंडे यांनी पिस्तुल रोखून त्यांना धमकावल्याचा आरोप झाल्यानंतर मागील काही दिवसांपासुन तोंडे वादात अडकले होते. त्यांच्या दबंग कार्यशैलीमुळे असंख्य सामान्य लोकांवर कारवाईचा बडगा उचलला गेला आहे. तसेच बंदुकीच्या जोरावर अशिक्षित आदिवासी जनतेमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न तोंडे करत असल्याचा आरोप करत गेल्या सोमवारी (दि.13) हजारो आदिवासींनी श्रमजीवीच्या माध्यमातून वाडा येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून तोंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची व त्यांची बदली करण्याची मागणी केली होती.

या आंदोलनाची दखल घेत ठाण्याचे मुख्य वनसंरक्षक नरेश झुगरे यांनी त्यांची बदली तुंगारेश्वर अभयारण्य, गोखिवरे, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरीवली येथे केली आहे. 

comments

About Rajtantra

Scroll To Top