दिनांक 30 May 2020 वेळ 7:28 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » वसईत 5 लाखांच्या वीजचोरीप्रकरणी गुन्हे दाखल

वसईत 5 लाखांच्या वीजचोरीप्रकरणी गुन्हे दाखल

राजतंत्र न्युज नेवटर्क/वसई, दि. 17 : पालघर जिल्ह्यातील विविध भागात महावितरणतर्फे वीज चोरी करणार्‍यांविरोधात धडक मोहिम राबविण्यात येत असुन यामाध्यमातून लाखोंचा दंड तसेच संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत वसई तालुक्यातील महावितरणच्या गोखिवरे व जुचंद्र कार्यालयातर्फे सुमारे 4 लाख 90 हजारांच्या वीजचोरीप्रकरणी संबंधितांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

महावितरणचे वसई पुर्वेतील गोखिवरे कार्यालयाचे सहाय्यक अभियंता यांनी या मोहिमेंतर्गत नुकतीच आपल्या कार्यालयाच्या हद्दीत पाहणी केली असता एका इसमाने त्याच्या घरासमोरील महावितरणच्या विद्युत खांबावरील विद्युत वाहिनीवर बेकायदेशीररित्या सर्व्हिस वायर जोडून राहत्या घरासह आपल्या लघुउद्योगासाठी त्याचा वापर करुन 1 लाख 34 हजार 320 रुपये किंमतीची वीज चोरी केल्याचे निदर्शनास आले. तर जुचंद्र कार्यालयाचे सहाय्यक अभियंता यांनी देखील अशाचप्रकारे आपल्या हद्दीत एकुण 3 लाख 56 हजार 340 रुपये किंमतीची वीज चोरी करणार्‍या एकुण तीन जणांविरोधात कारवाई केली आहे. दरम्यान संबंधितांविरोधात भारतीय विद्युत कायद्याचे कलम 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास करण्यात येत आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top