दिनांक 21 July 2019 वेळ 5:40 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » चारित्र्याच्या संशयातून छळ, महिलेची मुलासह आत्महत्या

चारित्र्याच्या संशयातून छळ, महिलेची मुलासह आत्महत्या

विरार-वैतरणादरम्यान रेल्वेसमोर उडी घेऊन संपवले आयुष्य

राजतंत्र न्युज नेवटर्क/विरार, दि. 17 : चारित्र्याच्या संशयातून पतीकडून होणार्‍या मानसिक व शारिरीक छळाला कंटाळून विवाहितेने आपल्या मुलासह आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. सदर विवाहितेने विरार-वैतरणादरम्यान रेल्वेसमोर उडी घेऊन आपले व पोटच्या मुलाचे आयुष्य संपवले.

मृत महिलेच्या वडिलांनी विरार पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या फिर्यादीनुसार, रत्नागिरी जिल्ह्यातील मुरवड येथे राहणार्‍या सदर महिलेचे 4 वर्षांपुर्वी विरार पुर्वेतील येसुबाई कंपाऊंड भागात राहणार्‍या इसमाशी लग्न झाले होते. या दोघांना एक मुलगाही होता. मात्र लग्नाच्या काही महिन्यानंतरच तिचा पती चारित्र्यावर संशय घेऊन तिचा मानसिक व शारिरीक छळ करु लागला. 14 मे रोजी दोघांमध्ये पुन्हा या कारणावरुन वाद झाला असता नेहमीच्या या छळाला कंटाळलेल्या महिलेने आपल्या मुलाला सोबत घेऊन संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास विरार-वैतरणादरम्यान रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली.

दरम्यान, याप्रकरणी तिच्या पतीविरोधात विरार पोलीस स्टेशऩमध्ये आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास सुरु आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top