दिनांक 25 August 2019 वेळ 2:07 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » राज्यातील तापमानात वाढ होणार, लोकांना काळजी घेण्याचे आवाहन

राज्यातील तापमानात वाढ होणार, लोकांना काळजी घेण्याचे आवाहन

राजतंत्र न्युज नेवटर्क/मुंबई, दि. 17 : राज्यातल्या बर्‍याच भागातील कमाल तापमानात 19 मे पासून वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. त्यामुळे राज्यातील नागरीकांनी आपली काळजी घेण्याचे आवाहन शासनातर्फे करण्यात आले आहे. विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशातील बर्‍याच भागातील कमाल तापमानात लक्षणीय वाढ होणार असल्यामुळे 25 मे पर्यंत या भागातील कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार आहे.

या दरम्यान अकोला, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांत कमाल तापमान 46 अंशापर्यंत पोहचण्याचा अंदाज आहे, तर चंद्रपूर जिल्ह्यात कमाल तापमान 47 अंशापर्यंत पोहचण्याची शक्यता नाकारता येणार नाही. विदर्भातल्या उर्वरित जिल्ह्यांसह धुळे, जळगाव, नांदेड आणि परभणी जिल्ह्यांत कमाल तापमान 45 अंशापर्यंत पोहणार असल्याचा अंदाज आहे.

उर्वरित मराठवाडा आणि खान्देशात कमाल तापमान 42 अंशाच्या आसपास राहील, असे मत हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. 18 ते 21 मे दरम्यान मुंबईतील कमाल तापमानात वाढ अपेक्षित आहे. वाढत्या तापमानापासून विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशातील लोकांनी काळजी घ्यावी. लोकांनी योग्य प्रमाणात पाणी प्यावे आणि उष्माघाताचे लक्षण आढळल्यास त्यावर लागलीच उपचार करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top