दिनांक 25 May 2019 वेळ 11:37 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » डहाणू येथे कामगाराची सहकार्‍याकडून हत्या

डहाणू येथे कामगाराची सहकार्‍याकडून हत्या

आरोपीला तात्काळ अटक

राजतंत्र न्यूज नेटवर्क/डहाणू, दि. 16 : अज्ञात कारणावरुन उद्भवलेल्या वादातून रेल्वे उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे काम करणार्‍या एका कामगाराने आपल्या सहकार्‍याची डोक्यात लोखंडी पाईपचा फटका मारुन हत्या केल्याची घटना घडली आहे. आरोपी कामगाराला पोलिसांनी अटक केली असुन अधिक तपास सुरु आहे.

अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील अलाहाबाद जिल्ह्यातील 4 कामगार मागील काही दिवसांपासुन डहाणू रेल्वे हद्दीतील समटा उड्डाणपुल येथे उड्डाणपुल दुरुस्तीचे काम करत आहेत. गेल्या मंगळवारी (दि. 14) रात्री 9.30 वाजेच्या सुमारास यातील 2 कामगारांमध्ये अज्ञात कारणांवरुन वाद झाला असता यातील आरोपी कामगाराने दुसर्‍याच्या डोक्यात लोखंडी पाईपचा जोरदार फटका मारत त्याची हत्या केली. तसेच मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करत मृतदेह खाडीत फेकुन दिला. यावेळी उपस्थित इतर दोन कामगारांनी याबाबत पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक करत त्याच्याविरोधात डहाणू पोलीस स्टेशनमध्ये हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top